September 23, 2023
PC News24
तंत्रज्ञान

भारताची महत्वाकांक्षी ऐतिहासिक भरारी; मिशन चांद्रयान-3 अवकाशात झेपावलं (आकर्षक फोटो सह).

भारताची महत्वाकांक्षी ऐतिहासिक भरारी; मिशन चांद्रयान-3 अवकाशात झेपावलं (आकर्षक फोटो सह)

आज भारताचे महत्वाकांक्षी तिसरं चांद्रयान-3 मिशन श्रीहरीकोटा येथून लॉन्च झालं आहे. चांद्रयान-3 ने आज दुपारी 2 वाजून 35 मिनिटांनी यशस्वी उड्डाण केले आहे.

इस्रो आणि भारतातील प्रत्येक नागरिकासाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला आहे. आज भारताचे महत्वाकांक्षी तिसरं चांद्रयान-3 मिशन लॉन्च झालं आहे. चांद्रयान-3 ने आज दुपारी 2 वाजून 35 मिनिटांनी यशस्वी उड्डाण केलं आहे. आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून हे अंतराळयान आज प्रक्षेपित करण्यात आलं आहे.


चंद्राच्या दिशेने LMV-3 M4मधून चांद्रयान 3 ची यशस्वी आगेकूच सुरू झाली आहे.इस्रोची ही आणखी एक ऐतिहासिक भरारी समजली जाते.
चंद्रावर जाणार असलेलं चांद्रयान -३ हे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार आहे. आतापर्यंत या ठिकाणी कुठलेही यान पोहोचलेले नाही. त्यामुळे संपूर्ण जगभरातील शास्त्रज्ञ भारताच्या चांद्रयान- 3 मोहीमेवर लक्ष ठेवून आहेत.

गेल्या चार वर्षांमध्ये जवळपास 615 कोटी रुपयांचा खर्च करुन चांद्रयान – 3 विकसित करण्यात आलं. आज अखेर हे अंतराळयान अवकाशात झेपावलं आहे. चांद्रयान 3 ऑगस्टमध्ये लँड करेल आणि त्याचा लँडर आणि रोव्हर चंद्राच्या एक दिवसा इतके काम करणार आहे. चंद्राचा एक दिवस म्हणजे पृथ्वीचे 14 दिवस. लँडर आणि रोव्हर केवळ चंद्रावरील एका दिवसासाठी काम करण्यासाठी डिझाइन केलेले आहेत, कारण ते रात्रीच्या अति थंडीचा सामना करू शकत नाहीत. त्यामुळे, त्यांना पहाटेच उतरावं लागतं.

चांद्रयान-3 च्या लँडर, रोव्हर आणि प्रोपल्शन मॉड्युलमध्ये एकूण सहा पेलोड्स जात आहेत. चांद्रयान-3 मध्ये ऑर्बिटर पाठवले जाणार नाहीत. या वेळी त्यासोबत स्वदेशी प्रोपल्शन मॉड्युल पाठवले जात आहे. ते लँडर आणि रोव्हरला चंद्राच्या कक्षेत घेऊन जाईल. यानंतर ते चंद्राभोवती 100 कि.मीच्या वर्तुळाकार कक्षेत फिरत राहील. त्याचे वजन 2145.01 किलोग्रॅम असेल, त्यापैकी 1696.39 किलो इंधन असेल. म्हणजेच, मॉड्युलचं वास्तविक वजन 448.62 किलो आहे.

इस्रोने 23-24 ऑगस्ट रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर लँडिंगची योजना आखली आहे, परंतु तेथील सूर्योदया नुसार त्यात बदल होऊ शकतो. चंद्राच्या पृष्ठभागाचं विश्लेषण करणं हे चांद्रयान -3 चं प्रमुख उद्दिष्ट आहे. यासोबतच भारताच्या या मोहिमेमुळे चंद्र मोहिमांसाठी आवश्यक असलेलं नवीन तंत्रज्ञान शोधण्यासाठीही मदत होईल. चांद्रयान -3 मोहिम यशस्वी झाल्यास चंद्रावर यान उतरवणारा भारत हा चौथा देश ठरेल.

Related posts

भारत तिसऱ्या चंद्र मोहिमेसाठी सज्ज,चांद्रयान-3 मोहिमेचे 14 जुलै रोजी दुपारी 2.35 वाजता प्रक्षेपण

pcnews24

चंद्रयान-३ चे रोव्हर चंद्रावर उतरतानाचा व्हिडिओ.

pcnews24

फेसबुक व इंन्साग्राम वर यांना 699 रुपये द्यावे लागणार, अधिक माहितीसाठी बातमी वाचा.

pcnews24

देश : भारताची बहुचर्चित मोहिम चांद्रयान 3 ने पाठवले चंद्राचे फोटो

pcnews24

‘एमटीएनएलला बंद करु शकते सरकार’

pcnews24

एनक्रिप्टेड मेसेजिंग अँप्सवर मोठ्या प्रमाणावर बंदी घालणारा भारत हा पहिला लोकशाही देश.

pcnews24

Leave a Comment