पिंपरी चिंचवड:जनावरांमध्ये आढळणाऱ्या लम्पीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तातडीने आवश्यक उपाय योजना करा; आयुक्तांचे निर्देश
लम्पी आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाने आवश्यक त्या सर्व उपाय योजना कराव्यात, असे निर्देश आयुक्त शेखर सिंह यांनी महापालिका प्रशासनाला दिले.
लम्पी आजाराचा संसर्ग वाढू नये यासाठी राज्य शासनाच्या पशु संवर्धन विभागाच्या सहकार्याने महापालिकेच्यावतीने उपाय योजना करण्यात येत आहे. या कामकाज नियोजनाचा आढावा आज आयुक्त शेखर सिंह यांनी घेतला, त्यावेळी ते बोलत होते.महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीत आज बैठक पार पडलेल्या या बैठकीस पशुवैद्यकीय विभागाचे उपआयुक्त संदिप खोत, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अरुण दगडे, आरोग्य विभागाचे सहाय्यक आयुक्त यशवंत डांगे, विशेष अधिकारी किरण गायकवाड तसेच संबंधित विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
लम्पीचा संसर्ग रोखण्यासाठी जनावरांचे प्रतिबंधात्मक लसीकरण करणे, शहरातील विविध भागात धुरीकरण करणे, आजाराची लक्षणे आढळून आलेल्या जनावरांवर तात्काळ वैद्यकीय उपचार करणे, आदी सूचना आयुक्त शेखर सिंह यांनी यावेळी दिल्या.