March 1, 2024
PC News24
अपघात

पुणे:’तू माझी झाली नाहीस तर….??एकतर्फी प्रेमातून तरुणाने महिलेचं डोकं फोडलं

पुणे:’तू माझी झाली नाहीस तर….??एकतर्फी प्रेमातून तरुणाने महिलेचं डोकं फोडलं

एकतर्फी प्रेमातून तरुणीवर कोयत्याचे वार असो किंवा दर्शना पवार सारखे हत्याकांड .. यासारख्या घटना पुणे शहरात ताज्या असताना एकतर्फी प्रेमातून तरुणाने तरुणीला मारहाण करून तिचे डोके फोडल्याचे समोर आले आहे. ही घटना कोरेगाव पार्क येथील बर्निंग घाट परिसरात घडली.

फिर्यादी महिला खराडी येथील आयटी कंपनीत नोकरी करते.तिचा घटस्फोट झाला आहे. काही महिन्यांपूर्वी संकेत म्हस्के याच्याशी तिची भेट होऊन ओळख झाली होती. त्याच्याबरोबरच आणखी एकाबरोबर तिची मैत्री झाली होती. दरम्यान, महिलेचा घटस्फोट झालेला पती पुन्हा तिच्या संपर्कात आल्याने संकेत म्हस्के याने एका महिन्यांपूर्वी माझे तुझ्यावर प्रेम आहे, म्हणून फिर्यादीशी जवळीक करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तिने आपला पती पुन्हा संपर्कात असून मी तुझी फक्त मैत्रीण राहू शकते, असे सांगितले होते. त्यानंतर फिर्यादीने आरोपी संकेत म्हस्केला ब्लॉक केलं मात्र काही दिवसांनी त्याला पुन्हा अनब्लॉक केले.

बुधवारी सकाळी सात वाजता महिला बर्निंग घाट येथे एका मित्राकडे आली त्यावेळी संकेत रिक्षातून आला. त्याने पाठीमागून येऊन फिर्यादीला पकडले.माझ्याशी बोलत आणि भेटत नाहीस,’ अशी विचारणा त्याने केली… ‘तू माझी झाली नाहीस, तर कोणाचीच होऊ देणार नाही,’ अशी धमकीही त्याने दिली. ‘माझे तुझ्यावर प्रेम नाही,’ ‘मी तुझी फक्त मैत्रीण राहू शकते’ असं उत्तर तरुणीने दिल्याने त्याने मारहाण केल्याचा आरोप आहे. शिवीगाळ करत त्याने लाकडी दांडक्याने फिर्यादीच्या हातावर जोरात मारले. या हल्ल्यात फिर्यादी हे खाली पडली. खाली पडल्यावर तीच्या डोक्यात दांडके मारुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तीच्या डोक्यातून रक्त येत असल्याचे पाहून संकेत म्हस्के पळून गेला.

संकेत शहाजी म्हस्के (वय २६.रा.संत गाडगे महाराज वसाहत, कोरेगाव पार्क) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी खराडी येथील आयटी कंपनीत काम करणाऱ्या ३७ वर्षाच्या तरुणीने कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Related posts

महाराष्ट्र:मानवी मनोरे रचताना दुर्घटनाग्रस्त झालेल्या गोविंदांना मिळणार इतके विमा संरक्षण.

pcnews24

निगडित पलटी झाला गॅस टँकर

pcnews24

वडगाव फाटा (मावळ) येथील कंपनीमध्ये केमिकल गळती, परिस्थीतीवर नियंत्रण

pcnews24

ताथवडे:जेएसपीएम महाविद्यालयाजवळ गॅस टॅंकरला भीषण आग,टेम्पोसह तीन स्कूल बस खाक.

pcnews24

मल्लपुरम – आतापर्यंत 21 मृतदेह सापडले!!

pcnews24

बेपत्ता असणाऱ्यांना मृत घोषित करणार!!

pcnews24

Leave a Comment