मावळ:मराठी चित्रपट अभिनेता रवींद्र महाजनी आढळले मृतावस्थेत
तळेगाव दाभाडे दि. 14 – मराठी चित्रपट अभिनेता रवींद्र हनुमंत महाजनी (वय 77)आंबी ता. मावळ ‘हद्दीतील एक्झर्बिया सोसायटीमध्ये मृतावस्थेत आढळून आला आहेत.
ही घटना शुक्रवारी (दि. 14) सायंकाळी 4 च्या सुमारास उघडकीस आली. त्यांचा मृत्यू तीन दिवसांपूर्वी झाला असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार मराठी चित्रपट अभिनेते रवींद्र ‘महाजनी हे मागील 8 ते 9
महिन्यापासून आंबी ता. मावळ हद्दीतील एक्झर्बिया सोसायटीमध्ये सोनाली यांच्या फ्लॅटमध्ये भाड्याने राहत होते. त्यांच्यावर काही दिवसांपूर्वी मोठी शस्त्रक्रिया झाली होती. अंघोळ करून कपडे बदलत असताना ते मृत झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. घटनास्थळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित सावंत, पोलीस उप निरीक्षक गोविंद चव्हाण व पोलीस अंमलदारांनी धाव घेतली.
मृतदेहाचा पंचनामा करून नातेवाईक सकाळी येणार असल्याने मृतदेह तळेगाव दाभाडे येथील जनरल हॉस्पिटल शीतगृहात ठेवण्यात आला आहे.
मराठी चित्रपट क्षेत्रातील मोठा अभिनेता असा मृतावस्थेत सापडल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.पोलीस उपनिरीक्षक गोविंद चव्हाण पुढील तपास करीत आहेत.
रवींद्र महाजनी यांनी हिंदी मराठी चित्रपटात भूमिका केल्या असून मराठी चित्रपट क्षेत्रात अनेक भूमिका केल्या आहेत. त्यात देवता, मुंबईचा फौजदार, झुंज, लक्ष्मी, गोंधळात गोंधळ, हळदी कुंकू असे चित्रपटात भूमिका केल्या. तसेच दिग्दर्शक, निर्माता म्हणून काम केले. रंजना,उषा नाईक व आशा काळे आदींसोबत चित्रपट केले आहे. त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत.