पुणे ग्रामीण पोलिस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या
पुणे ग्रामीण पोलिस दलात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. दोन वर्षे सेवा कालावधी पूर्ण झालेल्या पोलिस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांची बदल्या करण्यात आल्या आहेत. या अधिकाऱ्यांना नवीन पोलिस ठाण्यात रुजू होण्याचे आदेश पोलिस अधिक्षक अंकित गोयल यांनी दिले आहेत.
बदली झालेले अधिकारी आणि पोलिस ठाणे : संजय जगताप (कामशेत ते शिरूर), अण्णासाहेब घोलप (सासवड ते राजगड), उमेश तावस्कर (जेजुरी ते नियंत्रण कक्ष), महेश ढवाण (पोलिस कल्याण शाखा ते रांजणगाव), बळवंत मांडगे (रांजणगाव ते मंचर), सचिन पाटील (राजगड ते नियंत्रण कक्ष), विलास भोसले (वडगाव मावळ ते सुरक्षा शाखा), सतीश होळकर (मंचर ते आर्थिक गुन्हे शाखा), संतोष जाधव (सुरक्षा शाखा ते सासवड), बापूसाहेब सांडभोर (जिल्हा वाहतूक शाखा ते जेजुरी).
पुणे ग्रामीण पोलिस दलात नव्याने बदलून आलेले अधिकारी : बबन पठारे (नियंत्रण कक्ष), अण्णा पवार (आर्थिक गुन्हे शाखा), ललित वरटीकर (नियंत्रण कक्ष), रवींद्र पाटील (कामशेत), कुमार कदम (वडगाव मावळ), दिनेश तायडे (बारामती शहर), सुभाष चव्हाण (नियंत्रण कक्ष), राजेश गवळी (पोलिस कल्याण शाखा), सूर्यकांत कोकणे (नियंत्रण कक्ष), सुहास जगताप (जिल्हा वाहतूक शाखा) शंकर पाटील (भोर पोलिस ठाणे).