September 23, 2023
PC News24
राज्य

महाराष्ट्र:जसा पोपटाचा जीव पिंजऱ्यात असतो तसा आमच्या नेत्याचा जीव मुंबई महानगरपालिकेत, एकनाथ शिंदेंचा उध्दव ठाकरेंवर हल्लाबोल.

महाराष्ट्र:जसा पोपटाचा जीव पिंजऱ्यात असतो तसा आमच्या नेत्याचा जीव मुंबई महानगरपालिकेत, एकनाथ शिंदेंचा उध्दव ठाकरेंवर हल्लाबोल

जसा पोपटाचा जीव पिंजऱ्यात असतो तसा आमच्या नेतृत्वाचा जीव मुंबई महापालिकेत होता त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी कोणताही विचार न करता माझ्या एका शब्दावर मुंबई महानगरपालिका बिनविरोध करत महापौर पद शिवसेनेला दिलं. खरा युती धर्म पाळण्याचे काम देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. देवेंद्र फडणवीस हा खराखुरा निष्कलंक माणूस आहे.

२०१९ मध्ये कलंकितपणा तुम्ही केला बाळासाहेबांच्या नावाला कलंक तुम्ही लावला, अशा शब्दात एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. ते काल कोल्हापुरात पार पडलेल्या शिवसेना पदाधिकाऱ्यांचा मेळाव्यात बोलत होते.

मुंबई महापालिका निकालावेळी भाजपचा महापौर करण्याची तयारी झाली होती. मात्र, मी देवेंद्र फडणवीस यांना सांगितले, जसा पोपटाचा जीव कुठेतरी असतो तसा आमच्या नेत्याचा जीव महापालिकेत आहे. शिवसेनेला महापौर पद बिनविरोध द्या, माझ्या एका शब्दावर त्यांनी मुंबई महापालिका शिवसेनेला दिली आणि महापौर निवड बिनविरोध केली.त्यांनी लगेच पत्रकार परिषद घेत महानगर पालिका शिवसेनेला दिली हे जाहीर केले. देवेंद्र फडणवीस ही गोष्ट अजूनही कोठे बोलले नाहीत. २०१८ मध्ये देखील देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपद मिळालं असतं त्याबाबत चर्चा ही सुरू होत्या. मात्र त्यावेळी एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री झाला असता म्हणून चर्चा पुढे नेली नाही. हे सर्व माझ्यावर ओढवलेले प्रसंग आहेत, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

उद्धव ठाकरेंवर टीका करताना शिंदे म्हणाले, युती टिकावी यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी दरवेळी दोन पावलं मागे घेतली. मात्र,तुम्ही काय केलं २०१९ साली देखील युती टिकावी यासाठी प्रयत्न सुरू होते. देवेंद्र फडणवीस यांनी ४० ते ५० वेळा फोन केला. मात्र जसे निकाल हाती आले आणि आपल्याविना सरकार स्थापन होणार नाही असे आमच्या नेत्यांना वाटलं तेव्हा वेगवेगळे स्टेटमेंट येऊ लागले. फडणवीस यांचे फोनही त्यांनी घेतले नाहीत, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली लावत विरोधकांना बरोबर घेवून सत्ता स्थापन केली, अशा शब्दात एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. तसेच जेव्हा जेव्हा अन्याय होतो, तेव्हा एकनाथ शिंदे जन्म घेतो, पूर्वीची परिस्थिती वेगळी होती. बेरजेच्या राजकारणासाठी काही निर्णय घ्यावे लागतात. मी शिवसैनिकांच्या केसालाही धक्का लागू देणार नाही, असा विश्वासही शिंदे यांनी व्यक्त केला.

Related posts

महाराष्ट्र :”अजित पवार लोकं तुम्हाला जोड्याने मारतील ” – गोपीचंद पडळकर 

pcnews24

एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा, सामूहिक लग्नजोडप्यांना मिळणार हि रक्कम.

pcnews24

शेअर बाजारातील व्यवहार तेजीसह बंद; ‘या’ स्टॉक्सने बाजार सावरला

Admin

बांधकाम कामगारांच्या नोंदणीसाठी एक रुपया शुल्क,प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन निर्मितीचा संकल्प ,कामगार मंत्री श्री सुरेश खाडे.

pcnews24

‘ठाकरेंचा ‘ बदला ‘ तर शिंदेंचा ‘ बदल ‘

pcnews24

निष्काळजीपणे वाहन चालविणे आता,अजामीनपात्र गुन्हा दाखल.

pcnews24

Leave a Comment