February 26, 2024
PC News24
शाळा/महाविद्यालय/शैक्षणिक

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कासारवाडीच्या शाळेतील विद्यार्थ्यांचा जर्मनीला अभ्यास दौरा

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कासारवाडीच्या शाळेतील विद्यार्थ्यांचा जर्मनीला अभ्यास दौरा

संयुक्त राष्ट्रांच्या गेम चेंजमेकर या उपक्रमांतर्गत जर्मनी येथे होणाऱ्या ‘स्वच्छ पाणी आणि स्वच्छता’ यावरील परिषदेसाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कासारवाडी येथील छत्रपती शाहू महाराज इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील आठवीच्या वर्गातील सर्वसामान्य कुटुंबातील दहा विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. आज (शनिवारी) सायंकाळी सहा वाजता विद्यार्थी मुंबईला रवाना झाले असून तेथून ते जर्मनीकडे उड्डाण करणार आहेत. त्यांचा दहा दिवसांचा हा अभ्यास दौरा असणार आहे. भारतातून पिंपरी महापालिकेच्या शाळेत शिकणा-या गोरगरिबांच्या मुलांची अभ्यास दौ-यासाठी जर्मनीला निवड झाल्याने कासारवाडीकरांकडून आनंद व्यक्त केला जात आहे. विद्यार्थ्यांचा पासपोर्ट काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक श्याम लांडे यांनी सर्व मदत केली.

संयुक्त राष्ट्रांने गेम चेंजमेकर या उपक्रमांतर्गत जगातील सहा देशांना वेगवेगळे विषय दिले होते. भारताला ‘स्वच्छ पाणी आणि स्वच्छता’ हा प्रकल्प दिला होता. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कासारवाडीतील शाळेतील विद्यार्थी ‘SDG 6 -स्वच्छ पाणी आणि स्वच्छता’ यावर काम करत होते. शाळेच्या या प्रोजेक्टची जर्मनीतील हेलब्रॉन मध्ये पाणी, स्वच्छता यावर आयोजित परिषदेसाठी गेल्या वर्षी निवड झाली आहे.

कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी शाळेतील दहा विद्यार्थी, ताहुरा मणियार, श्रावणी टोनेज, गौरव पवार, क्षितीज गुजर,ईशा पाटील,ताहुरा शेख, सई लांडगे, अथर्व भाईप, आयेशा मुस्तफा, प्रथमेश जाधव आणि दोन शिक्षक फ्लोरिना फिलिप्स आणि गायत्री जे जाणार आहेत.मुख्याध्यापक प्रकाश पारिजात यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. परिषदेत या विद्यार्थ्यांचे भाषण, वेगवेगळ्या स्पर्धा होणार आहेत. नामवंत व्यक्ती मार्गदर्शन करणार आहेत.

महापालिका आयुक्त शेखर सिंह विद्यार्थ्यांना ऑनलाइन माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत. हा अभ्यास दौरा 25 जुलै 2023 पर्यंत असणार आहेत.विद्यार्थ्यांचा जर्मनीला जाण्याचा संपूर्ण खर्च आकांक्षा फाऊंडेशन सीएसआर फंडातून करत आहे. विद्यार्थ्यांचा पासपोर्ट काढण्याची माजी नगरसेवक श्याम लांडे यांनी मदत केली, ही प्रक्रिया सहा महिन्यापासून सुरू होती. अनेक अडचणी येत होत्या.विद्यार्थ्यांबरोबर त्यांच्या पालकांचाही पासपोर्ट लागत होता. काही विद्यार्थ्यांच्या पालकांचे निधन झाले आहे. अनेक अडचणींवर मात करत सर्व विद्यार्थ्यांचा पासपोर्ट काढला.

Related posts

वंचित मुलांना यावर्षी तरी मिळेल का सरकाळी शाळेची बससेवा?

pcnews24

अनधिकृत शाळांवर पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून कारवाई

pcnews24

महानगरपालिका:जल्लोष शिक्षणाचा पर्व २ चे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते उद्घाटन

pcnews24

नामांकित बिझनेस महाविद्यालयातील 40विद्यार्थ्यांना अचानक चक्कर येण्याचा त्रास-,पालकवर्ग चिंतेत.

pcnews24

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शाळा विस्तारासाठी चिखली, तळवडे गावात रस्त्याच्या जागा ताब्यात घेण्यासाठी शिबिराचे आयोजन.

pcnews24

“भारतरत्न लता मंगेशकर संगीत विद्यालय”- राज्यातील पहिल्या संगीत विद्यालयाचे उद्या भूमिपूजन.

pcnews24

Leave a Comment