पिंपरी-चिंचवड शहर पत्रकार संघ कार्यकारिणी 2023 ते 2024 ची निवड जाहीर,अध्यक्षपदी दादाराव आढाव
अखिल मराठी पत्रकार संस्था (रजि.) संलग्न असलेल्या पिंपरी-चिंचवड शहर पत्रकार संघ कार्यकारिणी 2023 ते 2024 साठी निवडणूक घेण्यात आली असून निवडणूकीत अध्यक्षपदी दादाराव आढाव यांची बिनविरोध निवड करण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब गोरे तर निवडणूक अधिकारी म्हणून ज्येष्ठ पत्रकार संतलाल यादव यांनी काम पाहिले.लोकशाही पद्धतीने ही निवडणूक घेण्यात असून त्यामध्ये पुढीलप्रमाणे कार्यकारणी बिनविरोध निवडण्यात आली.
अध्यक्ष दादाराव आढाव, समन्वयक कलिंदर शेख, उपाध्यक्ष गणेश शिंदे, विनय लोंढे, सरचिटणीस महेश मंगवडे, कोषाध्यक्ष बाबू कांबळे,चिटणीस संजय बोरा,अमोल डंबाळे कार्यकारणी सदस्य सायली कुलकर्णी, संतोष जराड, जितेंद्र गवळी, श्रद्धा कोतावडेकर-कामथे, विश्वास शिंदे, मुकुंद कदम तर प्रसिध्दी प्रमुख म्हणून युनूस खतीब यांची निवड जाहीर झाली.
यावेळी पिंपरी-चिंचवड डिजिटल मिडियाचे अध्यक्ष भीमराव तूरुकमारे पत्रकार संघाचे सदस्य प्रीतम शहा, सुहास आढाव, अल्ताफ शेख,उमेश जाधव,युनूस शेख,यशवंत गायकवाड,विनोद शिंदे,प्रसाद बोरसे,शफीक शेख इत्यादी पत्रकार उपस्थित होते.पिंपरी-चिंचवड शहर काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष भरत वाल्हेकर यांनी पदाधिकाऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रद्धा कोतावडेकर यांनी केले आणि आभार जितेंद्र गवळी यांनी मानले.