चिंचवड:साईनाथ बालक मंदिर चा आगळावेगळा उपक्रम,आजी आजोबांचा मेळाव्यात उत्साही प्रतिसाद.
श्री साईनाथ शिक्षण संस्थेतर्फे चालवल्या जाणाऱ्या श्री साईनाथ बालक मंदिर मध्ये शनिवार दिनांक १५ जूलै रोजी काशीधाम मंगल कार्यालय ,चिंचवड येथे आजी आजोबा मेळावा अत्यंत उत्साहात संपन्न झाला. पावसाळी अल्हाददायक वातावरणामध्ये बेळगाव ,सोलापूर, नगर, सातारा, मिरज ,कोल्हापूर ,पंढरपूर असे लांब लांबून आलेले सर्व आजी आजोबा आपल्या नातवाच्या शाळेतील कार्यक्रम बघण्यासाठी व त्याच्या प्रगती विषयी ऐकण्यासाठी उत्सुक होते .बाल वर्गातील वरद मावीन कट्टीने श्री संत नामदेवांचे अतिशय सुंदर किर्तन सादर करून कार्यक्रमाची सुरुवात केली .त्याच्या कीर्तनाने सर्व आजी आजोबा दंग झाले होते सर्व आजी-आजोबांची मने वरदने जिंकून घेतली .कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून माननीय श्री रामदास कुंभार व त्यांच्या सुविद्य पत्नी माननीय सौ.लिलावती कुंभार यांनी आपल्या मनोगतात आजी-आजोबा मेळाव्याचे कौतुक केले संस्थेचे अध्यक्ष माननीय डॉक्टर धामणे यांनी संस्थेच्या कार्याची माहिती सांगितली व आजी-आजोबा मेळाव्याची संकल्पना स्पष्ट केली. आजी आजोबा मेळाव्यास उपस्थित असलेल्या आजी-आजोबांना आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले त्यावेळी त्यांनी संस्थेच्या कार्याविषयी व मेळाव्याविषयी समाधान व्यक्त केले .आजी-आजोबा मेळाव्यास संस्थेचे अध्यक्ष माननीय डॉक्टर धामणे सर ,उपाध्यक्ष माननीय प्राध्यापक बेलसरे सर ,सेक्रेटरी माननीय सौ निशाताई बेलसरे यांची प्रमुख उपस्थिती होती. शाळेच्या कार्यकारी मुख्याध्यापिका रेवती नाईक ,स्वाती कुलकर्णी प्रज्ञा पाठक ,मानसीकुंभार, शितल कुलकर्णी यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यात मोलाचा सहभाग दिला. तसेच प्रज्ञा जोशी व योगिता देशपांडे यांनी सर्व शिक्षकांना मदत केली मेळाव्यासाठी 200 आजी आजोबा उपस्थित होते .सौ. मानसी कुंभार यांनी सूत्रसंचालन केले व सौ प्रज्ञा पाठक यांनी आभार मानले.