September 28, 2023
PC News24
गुन्हा

देश:लष्कर ए तोयबा आणि पी एफ आय दहशतवादी अफसर पाशाला नितीन गडकरींना धमकी दिल्याप्रकरणी अटक

देश:लष्कर ए तोयबा आणि पी एफ आय दहशतवादी अफसर पाशाला नितीन गडकरींना धमकी दिल्याप्रकरणी अटक

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी प्रकरणी नागपूर पोलिसांनी 28 मार्च रोजी जयेश पुजारी उर्फ शाकीरला 100 कोटींची खंडणी व बॉम्बस्फोटमध्ये उडविण्याची धमकी प्रकरणी बेळगाव तुरुंगातून ताब्यात घेऊन नागपुरात आणले होते, परंतु गुन्ह्याचा सूत्रधार लष्कर ए तोयबा आणि पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचा माजी सचिव अफसर पाशा असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.त्याला नागपूर पोलिसांनी बेळगाव कारागृहातून ताब्यात घेतले आहे.आता त्याची आणि जयेश पुजारी याची समोरासमोर चौकशी करण्यात येणार आहे. नागपुरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयात 4 जानेवारी आणि 21 मार्च धमकीचे फोन आले. तेव्हा कोट्यवधी रुपयांच्या खंडणीची मागणी करण्यात आली होती. त्यावेळी पुजारीला अटक केली होती.

सुरुवातीला पुजरीने दिशाभूल केली. मात्र त्यानंतर त्याने दिलेल्या माहितीमध्ये धमकीच्या कॉल्सचे सूत्रधार वेगळेच असल्याची शक्यता निर्माण झाली होती. पोलिसांनी मग तपास त्या दिशेने सुरु केला असता खंडणीसाठी कर्नाटक मधील एका तरुणीचा मोबाईल क्रमांक देण्यात आला होता.त्या तरुणीने पोलिसांना दिलेल्या माहितीच्या आधारावर बशीरुद्दीन नूर अहमद उर्फ अफसर पाशा हा यामागचा खरा सूत्रधार असल्याचं समोर आले.

पाशा हा 2012 मध्ये जम्मू काश्मीरमध्ये लष्कर ए तोयबासाठी दहशतवाद्यांची भरती करायचा हे सिद्ध झाले आहे.पुजारीचे पाशा बरोबरील संपर्काचे काही ठोस पुरावे नागपूर पोलिसांना मिळाले. त्यामुळे त्याला सहआरोपी करण्यात आले आहे.जयेश पुजरीच्या मार्फत गडकरींंना धमकी देण्यामागे लष्कर ए तोयबाच्या या कुख्यात दहशतवाद्याचा काय हेतू होता याची चौकशी सध्या पोलिसांकडून करण्यात येणार आहे.तसेच पाशाला नागपुरात आणल्यानंतर पोलीस पाशा आणि जयेशला समोरासमोर बसून चौकशी करणार आहेत.तेव्हाच या धमकी प्रकरणातील सत्य बाहेर येण्यास मदत होईल.

Related posts

कंटेनर चालक कामगाराने स्वतःच्याच ऑफिसमध्ये केली चोरी.

pcnews24

बेकायदेशीर पिस्टल बाळगल्या प्रकरणी हिंजवडी येथून दोघांना अटक

pcnews24

अनधिकृत होर्डिंग काढून टाकण्याचे आदेश.. महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाची ३७ होर्डिंगवर कारवाई.

pcnews24

सुषमा अंधारे यांंना कानशिलात,उठाशि गटातील जिल्हाप्रमुखाची पक्षातून हकालपट्टी

pcnews24

कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या भामट्याला अटक; मोदी शहांच्या नावाचा वापर

pcnews24

बेकायदेशीर गॅस cylinder रिफिलिंग करणाऱ्यावर पोलिसांची धडक कारवाई.

pcnews24

Leave a Comment