पुणे: पोलीस अकादमीमध्ये एकत्र शिकत असलेल्या अल्पवयीन मुलीवर सहकाऱ्या कडूनच अत्याचार
या घटनेबाबत मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार, तानाजी ब्रम्हा कांबळे आणि फिर्यादी मुलगी हे एका पोलीस अकादमीत ट्रेनिंगला एकत्र होते. तिथे त्यांची ओळख झाली. तिथे त्याने फिर्यादीसोबत प्रेम संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर फिर्यादी मुलीच्या इच्छेविरोधात तीन ते चार वेळा पुण्यातल्या बाळजीनगर येथील सायबा लॉज येथे घेऊन जाऊन पॉर्न विडिओ दाखवत शारीरिक संबंध केले. त्यानंतर पीडित मुलीला अनवॉन्टेड ७२ ही गर्भनिरोधक गोळी खायला देत होता तसेच विडिओ कॉल करून संबंध असेच सुरू ठेव अशी धकमी दिली. हा सगळा प्रकार सप्टेंबर २०२२ ते आता पर्यंत सुरू होता.
या प्रकरणाला कंटाळून मुलीने सहकारनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.सहकारनगर पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत आरोपीला ताब्यात घेतले. तसेच त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. तानाजी ब्रम्हा कांबळे ( वय ३५ रा. मूळ गाव कुतुर. ता आजरा जिल्हा कोल्हापूर) ह्या आरोपी विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबत सहकारनगरचे पोलीस उपनिरीक्षक राजगुरू अधिक तपास करत आहे.