March 2, 2024
PC News24
वाहतूक

पुणे – वेल्हे – रायगड नवीन मार्ग, पैसे आणि वेळ वाचणार तर पर्यटन वाढणार

पुणे – वेल्हे – रायगड नवीन मार्ग, पैसे आणि वेळ वाचणार तर पर्यटन वाढणार

वेल्हे तालुक्यातील भोरडी ते महाड तालुक्यातील शेवते या नवीन रस्त्याच्या कामाला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. त्यामुळे रायगडला जोडणारा हा तिसरा पर्यायी मार्ग उपलब्ध होणार आहे. सध्या भोर तालुक्यातून वरंध आणि मुळशी तालुक्यातील ताम्हिणी घाटमार्गे रायगड जिल्ह्यात जाता येते. आता नव्याने वेल्हे तालुक्यातून रस्ता होणार असल्याने नागरिकांचा प्रवास सुखकर होणार आहे. गेली अनेक वर्षे वेल्ह्यातून महाडला जोडणारा रस्ता करावा, यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू होते.

नवीन भोरडी, पिशवी, गुगुळशी, पांगारी ते शेवते (रायगड) हा पर्यायी रस्ता आमदार संग्राम थोपटे यांनी सूचवला होता. संबंधित विभागाने त्याची पाहणी करून अहवाल राज्य सरकारकडे पाठवला. त्यानुसार तेरा किलोमीटरच्या या रस्त्याला मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा दोनमधून पंचवीस कोटी ३२ लाख रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता मिळाल्याचे आमदार थोपटे यांनी सांगितले.

वेल्हे ते भोरडी फाटा ते शेवते हा १८ किलोमीटर लांबीचा रस्ता आहे. यातील १३ किलोमीटर लांबीच्या रस्त्याला मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मान्यता मिळाली आहे. यापूर्वी अर्थसंकल्पीय अधिवेशनात २.८ किलोमीटर रस्त्याच्या कामासाठी पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्यामध्ये सपाटीकरण करून साडेसात मीटर डांबरीकरण रस्ता, पाच ठिकाणी पाइप टाकण्यात येणार असल्याचे वेल्हे सार्वजनिक बांधकाम विभागाने सांगितले. उर्वरित २.२ किलोमीटरच्या रस्त्याचा प्रस्ताव आर अँड डी विभागाकडे पाठवला आहे. त्या कामासाठी चार कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे. नवीन मार्ग हा कमी अंतराचा होणार असल्यामुळे पुण्यातून महाड, रायगडला जाण्यासाठी प्रवासाचा वेळ वाचणार असून, इंधन आणि पैशांचीही बचत होणार आहे; तसेच या मार्गावरील पर्यटनालाही अधिक चालना मिळणार आहे.

Related posts

पिंपरी चिंचवड:वाहतूक नियम उल्लंघनात पिंपरी-चिंचवडकर आघाडीवर,तब्बल सहा कोटींचा दंड वसूल.

pcnews24

अरे वाह..स्वातंत्र्यदिनी स्वस्तात विमान प्रवासाची संधी

pcnews24

धावत्या शिवशाही बसचे चाक निखळले.

pcnews24

पीएमपीच्या बसेस तिकीटात 25 टक्के सवलत

pcnews24

पुणे:पीएमपीएमएल च्या दोन नवीन बस सेवा ; कोणत्या ते वाचा

pcnews24

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर आज ब्लॉक!

pcnews24

Leave a Comment