भोसरी:कंपनीतील व्हिडीओ व्हायरल करण्याची महिलेला धमकी
एमआयडीसी भोसरी मध्ये काम करीत असलेल्या महिलेचा कंपनीच्या शौचालयातील व्हिडीओ चित्रित केला व तो व्हायरल करेन अशी धमकी देत तिच्याकडे शरीर सुखाची तसेच पैशाची मागणी केल्याचा प्रकार घडला आहे.
सुनील हरिबा कांबळे (वय 36, रा. चिखली. मूळ रा. धाराशिव) याने फिर्यादी काम करत असलेल्या कंपनीच्या शौचालयात व्हिडीओ चित्रित करून तो फिर्यादी यांच्या व्हाटसअपवर पाठवला त्यानंतर व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत फिर्यादीकडे शरीर सुखाची तसेच तीन हजार रुपयांची मागणी केली.
ही घटना शुक्रवार (दि. 14) सकाळी आठ ते शनिवारी (दि. 15) सायंकाळी साडेचार वाजताच्या कालावधीत एमआयडीसी भोसरी आणि आदर्शनगर भोसरी येथे घडली.याबाबत फिर्यादीने पोलिसात तक्रार केली असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.