September 28, 2023
PC News24
अपघात

पुणे-नगर महामार्गावर कोरेगाव भीमा येथे भीषण अपघात, दोघांचे प्राण आश्चर्यरित्या वाचले.

पुणे-नगर महामार्गावर कोरेगाव भीमा येथे भीषण अपघात, दोघांचे प्राण आश्चर्यरित्या वाचले

पुणे – नगर कोरेगाव भीमा ( ता.शिरूर) येथील भीमा नदी पुलावरील वळणावर आज पहाटे साडेतीनच्या सुमारास एका स्विफ्ट गाडीचा भीषण अपघात झाला. पुणे – नगर महामार्गावरून ही गाडी साधारण पन्नास ते साठ फूट खड्ड्यात ही गाडी पलटी झाली. गाडीच्या एअर बॅग वेळेत ओपन झाल्याने मोठी दुर्घटना टळली आहे आणि दोघांचे प्राण आश्चर्यरित्या वाचले आहेत. स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्या गाडीतील तरुणाला ग्रामस्थांनी गाडीच्या काचा फोडून बाहेर काढले.

ऋषिकेश यादव (वय ३५), एकनाथ शिंगाल (वय ३३) अशी गाडीतून वाचवण्यात आलेल्या तरुणांची नावे असून यात ते दोघेही जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

कोरेगाव भीमा येथे पुण्याकडून नगरकडे जाणाऱ्या बाजुने रात्री साडेतीनच्या सुमारास वेगाने जाणाऱ्या एम एच १२ टी के ३९७६ स्विफ्ट गाडीच्या चालकास वळणाचा अंदाज न आल्याने रस्त्याच्या उजव्या बाजूला वेगात पलटी झाली. मात्र, या गाडीच्या पुढील भागातील एअर बॅगा ओपन झाल्या होत्या. पलटी झालेल्या गाडीतील एका तरुणाची मान खिडकीच्या काचेत अडकली होती. यावेळी स्थानिक नागरिकांनी तातडीने मदत करत जखमी तरुणांचा जीव वाचवला. तरुणांना जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यासाठी स्थानिक नागरिकांनी १०८ क्रमांकावर फोन केला. मात्र तातडीने कोणतीही मदत मिळाली नाही अशी तक्रार आहे.

Related posts

36 तासानंतर महिला ढिगाऱ्याखाली जिवंत.

pcnews24

निगडित पलटी झाला गॅस टँकर

pcnews24

भरधाव बसची दोन्ही चाकं निखळली, नक्की काय घडला प्रकार.

pcnews24

इर्शाळवाडी दरड दुर्घटनेची गृहमंत्री अमित शहांकडून दखल, मुख्यमंत्र्यांकडून मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख.

pcnews24

समृद्धी महामार्गावर प्रवासी बसचा भीषण अपघात, बस जळाल्याने 25 प्रवाशांचा मृत्यू तर 8 जखमी.

pcnews24

वडगाव फाटा (मावळ) येथील कंपनीमध्ये केमिकल गळती, परिस्थीतीवर नियंत्रण

pcnews24

Leave a Comment