भाजप आमदार उमा खापरे राज्य पातळी वरील प्रश्न मांडण्यात यशस्वी…शहरातील आमदारांचा लक्षवेधीवर ‘लक्ष्यवेध’
पिंपरी-चिंचवड शहरातील लोकप्रतिनिधीं जरी राज्याच्या विधीमंडळात चमकले नसले तरी लक्षवेधी औचित्याचा मुद्दा व चर्चेचे विषयाच्या माध्यमांतून शहरातील भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार संमिश्र स्वरूपात आपल्या भागातील प्रश्न मांडत आहेत. तर दुसरीकडे विधान परिषदेत भाजपच्या आमदार उमा खापरे यांनी पहिल्याच वर्षात राज्य पातळी वरील प्रश्न मांडण्याचा यशस्वी प्रयत्न केल्याचे दिसून येते.
*विधान परिषद सदस्य आमदार उमा खापरे*
यांनी पावसाळी अधिवेशनात यावेळी ६ विषय उपस्थित केले.
मागील वर्षामध्ये उपस्थित केलेले विषय : ३२५- विधी मंडळाच्या पटलावर आलेले विषय : ५- विधी मंडळात चर्चा झालेले विषय : ४- मार्गी लागलेले विषय : ५-
यावेळी पावसाळी अधिवेशनात मांडलेले प्रमुख विषय -१) अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील व शहरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी सरकारने कार्यवाही व उपाययोजना करावी.
२) अहमदनगर जिल्हा परिषदेने पंधराव्या वित्त आयोगाचा आढावा करताना सर्व तालुक्यांना समान निधी न देता दुजाभाव केल्याचे जून २०२३ मध्ये निदर्शनास आले. याबाबत करावयाची उपाययोजना व कार्यवाही..३)अहमदनगर जिल्ह्यातील कुकडी पाटबंधारे विभागातील कामासाठी आलेल्या निधीची माहिती अधिकारामध्ये न देता गोपनीयतेचा कायदा पुढे करून माहिती नाकरण्याची सखोल चौकशी व सरकारने कार्यवाही करावी.४) कोल्हापूर येथील छत्रपती प्रमिलाराजे जिल्हा रुग्णालयाकडे पुरेशा रुग्णवाहिका नसने, रुग्णालयातील आरोग्य व्यवस्थेचा उडालेला बोजवारा,सोयीसुविधां बाबत सरकारने कार्यवाही व उपाययोजना करावी.५) सांगली जिल्ह्यात लम्पी रोगाने पुन्हा डोके वर काढले. पशुपालन वैद्यकीय दवाखान्यात दुरवस्था व पशुसंवर्धन विभागात दोन महिन्यापासून एक्स रे मशिन धूळखात पडल्याने याबाबत सरकारने कार्यवाही व उपाययोजना करावी.
६) राज्यात आरटीई अंतर्गत शाळांना सरकारने १८०० कोटी रुपयांचा निधी दिला नसल्याने गरीब कुटुंबातील मुलांच्या शिक्षणात फटका बसत आहे. हा चार वर्षांचा निधी त्वरित देण्याबाबत सरकारने कार्यवाही व उपाययोजना करावी.
आतापयंत अधिवेशनात मार्गी लागलेले प्रमुख विषय-
१) मुंबईतील दादरचा, जीपीओ समोरील फोर्ट येथील कबुतर खान्यांना हेरिटेज दर्जा असून, ते जतन करावे व खासगी बंद करण्यास मंजुरी.
२) अवैध सावकारीमुळे सांगली जिल्ह्यातील पलूस येथे शेतकऱ्याची आत्महत्या झाल्याने अवैध सावकारीस आळा घालण्याच्या मागणीला प्रतिसाद देत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येक जिल्ह्यात त्रिसदस्यीय समिती चौकशीसाठी नियुक्त
३) देहूरोड येथील दारूगोळा फॅक्टरीच्या रेडझोनची हद्द कमी करण्याच्या मागणीला पुणे जिल्हा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रतिसाद देत संरक्षण मंत्री व मुख्यमंत्री यांची संयुक्त बैठक घेण्याचे आश्वासन दिले
४) अपंग, विधवा, परितक्त्या महिलांना वारसा हक्काची पेन्शन मिळण्यासाठी मंजुरी
५) बुलडाणा जिल्ह्यातील चिखलीतील प्राथमिक शाळेतील शिक्षकाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्यामुळे त्यांना निलंबित केले.
भोसरी विधानसभा मतदारसंघ : आमदार महेश लांडगे पावसाळी अधिवेशनात उपस्थित केलेले विषय : ७-या पंचवार्षिकमध्ये उपस्थित केलेले विषय : २१- विधी मंडळाच्या पटलावर आलेले विषय : १४- विधी मंडळात चर्चा झालेले विषय : ११ -मार्गी लागलेले विषय : ११-
यावेळी पावसाळी अधिवेशनात मांडलेले प्रमुख विषय
१) पिंपरी-चिंचवडसाठी नवीन जलस्रोत निर्मिती करावी.२)मिळकत धारकांवरील उपयोगिता शुल्क व दिंड माफ करावा३) समाविष्ट गावांच्या विकासासाठी ‘ विशेष पॅकेज’ मिळावे.४) मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी धोरणात्मक निर्णय घ्यावा५) औद्योगिक पट्ट्यातील समस्या व प्रस्तावित प्रकल्प मार्गी लावावेत.६) ‘एज्युकेशन हब’संदर्भात ‘पीएमआरडीए’ने पुढाकार घ्यावा
आतापर्यंत अधिवेशना मध्ये मार्गी लागलेले प्रमुख विषय –
१) शास्तीकर सरसकट माफी
२) सोसायटीधारकांच्या समस्या सोडवण्यासाठी धोरणात्मक उपाययोजना
३) अनधिकृत बांधकाम हजार चौरस फुटापयंतची सर्व बांधकामे नियमित
४) नदी सुधार प्रकल्पाठी सुमारे ९५० कोटी रुपयांची निधी तरतूद
५) प्राधिकरणबाधित नागरिकांचा परतावा
६) एमआयडीसीतील लघुउद्योजकांच्या सांडपाण्यावर प्रकिया करण्यासाठी ‘सीईटीपी’राज्य सरकारकडे प्रलंबित विषय
१) नदीपात्रालगत मुख्य रस्त्यांना पर्यायी जोडरस्ता तयार करणे२) पुणे-नाशिक महामार्ग रुंदीकरणासाठी भूसंपादन
३)पुणे-पिंपरी-चिंचवड-हिंजवडी-चाकण मेट्रो विस्तार