March 1, 2024
PC News24
राजकारण

भाग २ चिंचवड विधानसभा मतदारसंघ : आमदार अश्‍विनी जगताप.

भाग २ चिंचवड विधानसभा मतदारसंघ : आमदार अश्‍विनी जगताप

यावेळी पावसाळी अधिवेशनात मांडलेले विषय : ८१टीप : चिंचवड विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीत दोन मार्च २०२३ रोजी आमदार अश्विनी जगताप या निवडून आल्या. सभागृहात त्यांचा आमदार म्हणून नऊ मार्च २०२३ रोजी शपथविधी झाला. तोपर्यंत अधिवेशनात प्रश्‍न मांडण्याची मुदत संपलेली होती. त्यामुळे त्यांना या अधिवेशनातच प्रथमच प्रश्‍न उपस्थित करण्याची संधी मिळत आहे. – वेळी पावसाळी अधिवेशनात मांडलेले प्रमुख विषय१) राज्यात कोरोना काळात आई किंवा वडील दगावलेल्या अनाथ मुलांसाठी आखण्यात आलेल्या बाल न्याय निधीचे वाटप संथगतीने सुरू २) किवळे येथील जाहिरात दुर्घटनेतील मृत्युमुखी पडलेल्या व जखमींना महापालिके मार्फत मदत मिळावी व शहरातील होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करावे ३) नवी सांगवी (औंध) येथील जिल्हा रुग्णालयातील फार्मासिस्ट व औषध खरेदीची उच्चस्तरीय चौकशी व ऑडिट करावे४) गरवारे नायलॉन कंपनीच्या कामगारांचे २२ वर्षांपासून थकीत व कंपनीच्या जागेच्या खरेदी विक्रीतील अनियमितते बाबतची उच्चस्तरीय चौकशी व्हावी५) पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील अधिकृत मोबाईल टॉवर्सचे स्ट्रक्चरल ऑडिट करणे व अनधिकृत मोबाईल टॉवर्सवर कारवाई करावी ६) पिंपरी-चिंचवड शहरा लगतच्या सात गावांचे महापालिका क्षेत्रात समाविष्ट करण्याबाबतचा प्रलंबित प्रस्ताव मंजूर करावा-

पिंपरी विधानसभा मतदारसंघ : आमदार अण्णा बनसोडे

यावेळी पावसाळी अधिवेशनात उपस्थित केलेले विषय : २७- या पंचवार्षिकमध्ये उपस्थित केलेले विषय : १३५- विधी मंडळाच्या पटलावर आलेले विषय : ३०- विधी मंडळात चर्चा झालेले विषय : ८- मार्गी लागलेले विषय : ८- यावेळी पावसाळी अधिवेशनात मांडलेले प्रमुख विषय१) शहरातील नदी प्रदूषण२) शहरातील पुणे-मुंबई महामार्गाची दुरवस्था३) महापालिकेकडे हस्तांतरित झालेल्या ‘एमआयडीसी’च्या भूखंडांवर अद्याप विकास नाही४) बोपखेल येथे जागा ताब्यात नसताना महापालिकेने काढलेली मैला शुद्धीकरण प्रकल्पाची (एसटीपी) निविदा. ही प्रकियाच संशयास्पद; चौकशीची मागणी५) झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांची गैरसोय. सोयी-सुविधा न देण्याची कारणे६) सिंधी बांधवांना २००५ पासून सनद देणे बंद असल्याने अनेकजण सनदीपासून वंचितआतापर्यंत मार्गी लागलेले प्रमुख विषय१) बोपखेलमध्ये नागरिकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यास तत्त्वतः: मंजुरी२) शहरातील पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी अमृत जल-२ योजनेमधून निधी उपलब्ध झाला३) शहरातील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांना गती देण्यात यश४) सायन्स पार्कमधील तारांगण प्रकल्पास राज्य सरकारची मंजुरी५) भामा-आसखेड धरणाचे पाणी शहरात आणण्याच्या कामास गती६) आकुर्डी रेल्वे स्टेशन ते गंगानगरकडे जाणाऱ्या अंडरपास रस्त्यास मंजुरीराज्य सरकारकडे प्रलंबित विषय१) शहरातील सार्वजनिक वाहतूक समस्या सोडविण्यासाठी राज्यस्तरीय समितीची बैठक प्रलंबित२) ‘पीएमपीएमएल’च्या मार्गिका व बसथांबे व्यवस्थित करणे३) शहरातील पाणीपुरवठा दररोज पुरेसा व नियमित करणे.

Related posts

मद्यप्राशन केलेल्या तरुणाची धावत्या बसवर दगडफेक.

pcnews24

मराठा विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणापासून सरकार जाणीवपूर्वक वंचित ठेवतय का?शिंदे- फडणवीस सरकारवर सुनिल गव्हाणे यांची टिका

pcnews24

विद्यार्थ्यांशी मुख्यमंत्र्यांनी साधला संवाद.

pcnews24

शरद पवार यांची अध्यक्षपदाची निवड घटनाबाह्य,ते आपल्या मर्जीनुसार पक्ष चालवतात : अजित पवार गट

pcnews24

लाठीमारात जखमी झालेल्यांची मी माफी मागतो -फडणवीस

pcnews24

पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी (शरद पवार गटाची) महीला कार्यकारणी जाहीर.

pcnews24

Leave a Comment