September 28, 2023
PC News24
तंत्रज्ञान

पुणे:ज्येष्ठ गणिततज्ज्ञ मंगला नारळीकर यांचे निधन.

पुणे:ज्येष्ठ गणिततज्ज्ञ मंगला नारळीकर यांचे निधन

शालेय विद्यार्थ्यांपर्यंत गणित सोपे करून देण्यात मोलाचे योगदान दिलेल्या ज्येष्ठ गणिततज्ज्ञ मंगला नारळीकर यांचे आज पुण्यात निधन झाले.जेष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्या त्या पत्नी होत्या.डॉ. मंगला नारळीकर यांना काही वर्षांपूर्वी स्तनाचा कर्करोग झाला होता त्यावर उपचार घेऊन त्या बऱ्याही झाल्या मात्र त्यानंतर त्यांना फुफ्फुसाचा कर्करोग झाला. त्यावर उपचार सुरू होते परंतु दुर्दैवाने यातच त्यांचा मृत्यू झाला.

डॉ. मंगला नारळीकर यांचा विवाह 1966 मध्ये डॉ. जयंत नारळीकर यांच्याशी झाला.शास्त्रज्ञ व लेखिका अशी ओळख असणाऱ्या डॉ. मंगला नारळीकर या 79 वर्षांच्या होत्या. त्यांचे पुण्यात राहत्या घरी आज सकाळी 5.30 च्या दरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.आज त्यांच्यावर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यांना गीता, गिरिजा व लीलावती अशा तीन कन्या आहेत.

डॉ. मंगला नारळीकर यांची कारकीर्द :

-इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेन्टल रिसर्च (मुंबई), केंब्रिज विद्यापीठात , मुंबई आणि पुणे विद्यापीठ(सध्याचे सावित्रीबाई फुले विद्यापीठ) आदी नामवंत संस्थांमध्ये त्यांनी अध्यापन आणि संशोधनाची जबाबदारी पार पाडली आहे.

-1974 ते 1980 या काळात त्यांनी प्राध्यापक के. रामचंद्र यांच्या मार्गदर्शनाखाली टाटा इन्स्टिट्युट येथे संशोधन करुन गणित विषयात पदवी मिळवली.

-अध्यापन, संशोधना सोबतच विविध विषयांवर पुस्तकेही लिहीली आहेत. त्यातील बहुतांश पुस्तके ही विज्ञानावर आधारीत आहेत.

-विविध प्रकारचे संशोधन केले असून त्यांचे काही रिसर्च पेपरही प्रसिद्ध केले आहेत.विविध पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. राज्याच्या संशोधन आणि वैज्ञानिक अभ्यास करणाऱ्या वर्तुळाला त्यांच्या निधनामुळे मोठा धक्का मानला जात आहे. त्यांचे मार्गदर्शन अनेकांसाठी मोलाचे राहिले आहे.

Related posts

लिंडा याकोरिनो ट्विटरच्या नवीन CEO ?

pcnews24

महाराष्ट्र:सोशल मीडियावर महापुरूषांची बदनामी करणाऱ्याना बसणार दणका.. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस.

pcnews24

एनक्रिप्टेड मेसेजिंग अँप्सवर मोठ्या प्रमाणावर बंदी घालणारा भारत हा पहिला लोकशाही देश.

pcnews24

चिंचवड आनंदवन सोसायटी मधे बहरली सफरचंद,बागप्रेमींची आवर्जून भेट

pcnews24

थोड्याच वेळात आदित्य L1 सूर्याकडे झेपावणार.

pcnews24

BSNL ला 89,000 कोटी रुपयांचे पॅकेज

pcnews24

Leave a Comment