चिंचवड:जनता सहकारी बँक चिंचवडगांव शाखा शांतीबन सोसायटी येथे स्थलांतरीत
जनता सहकारी बँक- चिंचवडगांव शाखेचे शांतीबन सोसायटी, जुना जकात नाका, वाल्हेकर वाडी कॉर्नर,या नवीन जागेत नुकतेच स्थलांतर झाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पिंपरी चिंचवड जिल्हा संघचालक विनोद बन्सल आणि क्रस्ना डायग्नोस्टिक लि.चे संचालक राजेंद्र मुथा यांच्या शुभहस्ते नवीन शाखेचे उद्घाटन झाले.
चिंचवड देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त मंदार महाराज देव यांच्या शुभहस्ते एटीएम व ई-बँकिंग सेवा केंद्राचे उद्घाटन केले.
उद्घाटन प्रसंगी बँकेचे अध्यक्ष रवींद्र हेजीब, उपाध्यक्ष ॲड. अलका पेठकर, संचालक प्रभाकर कांबळे , सीए किसन खानेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी जगदीश कश्यप आणि बँकेचे वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते.
प्रथम सहाय्यक शाखा व्यवस्थापक लक्ष्मीकांत देशपांडे यांनी सर्वाचे स्वागत व प्रास्ताविक केले. प्रमुख पाहुणे देव महाराज, विनोद बन्सल, राजेंद्र मुथा यांचा स्मृतिचिन्ह देऊन बँकेच्या वतीने सत्कार केला.तसेच बँक वास्तु सहकार्याबद्दल दिलीप सोनिगरा, जितेंद्र सोनिगरा, चंद्रशेखर काळे आणि वास्तु बांधकामाबद्दल आर्किटेक्ट आशिष देशपांडे व योगेश कामठे यांचाही सत्कार केला.
मंदार महाराज देव यांनी बँकेच्या प्रगतीसाठी शुभाशीर्वाद दिल्या तर विनोद बन्सल यांनी शुभेच्छा दिल्या. सध्या सहकारी बँकांच्या समोर अनेक आव्हाने असून या बँकेचा ग्राहकांशी व्यक्तीगत संपर्क असल्याचे एक वैशिष्ट्य आहे तसेच खाजगी व सरकारी बँकेच्या बरोबरीने नवीन टेक्नॉलॉजीतही बँक पुढे असल्याबाबत समाधान व्यक्त केले.
शाखेच्या सेवा व प्रगतीविषयी राजेंद्र मुथा यांनी समाधान व्यक्त केले. बँकेचे अध्यक्ष रवींद्र हेजीब यांनी चिंचवडगाव शाखा दीर्घकाळ ग्राहकांना सेवा देत असून ग्राहकांचे बँकेबरोबर वेगळे नाते असल्याने सर्वांना धन्यवाद दिले
कार्यक्रम प्रसंगी परिसरातील खातेदार सभासद हितचिंतक व्यावसायिक, पतसंस्थेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यात डॉ. दिलीप कामत, मधु जोशी, प्रवीण पोकर्णा , शिवाजी शेडगे, हेमंत हरहरे, चंद्रशेखर पाठक, बाळासाहेब सुबंध, उदय हळदीकर, राजेंद्र काकडे, बारसावडे, अशोक शहा, आडसूळ, नगरसेविका अश्विनी चिंचवडे, पाटील बुवा चिंचवडे, महेश कुलकर्णी, वसंत गुजर, चिंचवड ज्येष्ठ नागरिक संघाचे गोपाळ भसे, शरद इनामदार आदी मान्यवर सुद्धा उपस्थित होते.
शाखा व्यवस्थापक प्रदीप काशीकर यांनी सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लक्ष्मीकांत देशपांडे यांनी केले.