थेरगाव:‘भेटायला ये नाहीतर …? एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीला धमकी
ऋषिकेश संजय बारणे (वय 21, रा. थेरगाव) हा तरुण एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीचा गेले अडीच वर्षे पाठलाग करीत असून तिचा विनयभंग करीत आहे. हा प्रकार पिंपरी येथे घडला. याप्रकरणी पिडीत मुलीच्या आईने शनिवारी (दि. 15) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची मुलगी पिंपरी येथील एका महाविद्यालयात शिक्षण घेते. ती कॉलेजला जात येत असताना आरोपीने तिचा वारंवार पाठलाग करत होता, तसेच तिची इच्छा नसताना तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होता त्यानंतर आरोपीने फिर्यादी यांच्या मुलीला ‘भेटायला ये नाहीतर तुझ्या घरी येईन’ अशी धमकी दिली आणि विनयभंग केला. गेली अनेक दिवस तो त्रास देत असल्यामुळे कंटाळून मुलीने आईला सांगितले त्यानंतर पिडीत मुलीच्या आईने शनिवारी (दि. 15) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.