मनधरणीसाठी आमदार गेले.. पण ??शरद पवारांनी विचारला एकच प्रश्न
राज्याच्या राजकारणात दररोज नवनवीन घडामोडी घडताना दिसत. आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार आणि शरद पवार असे दोन गट झाले.अजित पवार गटाकडून मंत्रीमंडळात सामील होऊन मंत्रीपदे घेतल्यानंतर शरद पवारांची समजूत काढण्याचा सतत प्रयत्न होत आहे. या पार्श्वभूमीवर आज अजित पवार गटने वायबी सेंटर येथे शरद पवारांची पुन्हा एकदा भेट घेतली.
अजित पवार यांच्या नेतृत्वात प्रफुल्ल पटेल आणि आमदार वायबी सेंटरवर दाखल झाले होते. यावेळी शरद पवार यांची भेट घेतली. असता आमदारांनी शरद पवार यांना पक्षात फुट पडू देऊ नये, अशी विनंती केली. यावर शरद पवार यांनी उपस्थित आमदारांना आपआपल्या भागात पेरण्या झाल्या का, अशी विचारणा केली.
अजित पवार गटाकडून सातत्याने शरद पवारांची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं दिसून येत आहे. काल रविवारी देखील अजित पवार गटाच्या नेत्यांनी शरद पवारांची वायबी सेंटर येथे भेट घेतली होती. आज देखील भेट घेण्यात आली. या भेटीनंतर प्रफुल्ल पटेल म्हणाले की, आज देखील आम्ही शरद पवार यांना पक्षात फूट देऊ नये, अशी विनंती केल्याचं सांगितलं.