पुण्यातील वाघोली परिसरात असलेलं एक गोडाऊन फोडून 105 आयफोन लंपास
पुण्यातील लोणीकंद पोलीस स्टेशनच्या वाघोली परिसरात असलेलं एक गोडाऊन फोडून चोरांनी तब्बल 105 आयफोन चोरून नेले आहेत याची मार्केट मधील किंमत तब्बल 65 लाख रुपये आहे.
वैभव झेंडे यांनी याप्रकरणी लोणीकंद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. लोणीकंद पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल केला आहे
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, रात्री फिर्यादी यांनी नेहमीप्रमाणे गोडाऊन बंद केले होते. त्यानंतर रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्याने गोडाऊनचा सिमेंटचा पत्रा फोडून आत प्रवेश केला आणि आयफोन लंपास केले.दुसऱ्या दिवशी फिर्यादी नेहमीप्रमाणे गोडाऊनमध्ये आले असता हा संपूर्ण प्रकार त्यांच्या लक्षात आला. त्यांनी तातडीने या प्रकरणी तक्रार दिली. लोणीकंद पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.