पिंपरी:जागतिक न्याय दिनानिमित्त पिंपरी न्यायालयात वृक्षारोपण कार्यक्रम
जागतिक न्याय दिनानिमित्त सोमवारी (दि. 17) पिंपरी न्यायालय आवारात वृक्षारोपण करण्यात आले. पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशचे अध्यक्ष ॲड. नारायण रसाळ व कार्यकारणीने या उपक्रमाचे आयोजन केले होते.यावेळी. यावेळी बहूगुणी असलेल्या कडुनिंबाची झाडे न्यायालय परिसरात लावण्यात आली.
वृक्षारोपण कार्यक्रम प्रसंगी पिंपरी न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश आर. एस. वानखेडे, सह न्यायाधीश आर.एम. गिरी,पिंपरी चिंचवड ॲड.बार असोसिएशनच्या उपाध्यक्षा ॲड. जयश्री कुटे, सचिव ॲड. गणेश शिंदे, सहसचिव ॲड. मंगेश नढे, खजिनदार ॲड. विश्वेश्वर काळजे,
ऑडिटर ॲड. राजेश रणपिसे, सदस्य ॲड. सौरभ जगताप, ॲड. अक्षय केदार, ॲड. ॲड. प्रशांत बचूटे, ॲड. नितिन पवार तसेच पिंपरी चिंचवड ॲड. बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲड. विलास कुटे, माजी अध्यक्ष ॲड. सुदाम साने,माजी अध्यक्ष राजेश पुणेकर, माजी उपाध्यक्ष ॲड. गौरव वाळुंज, ॲड. पूनम राऊत, ॲड. संगीता कुसाळकर, ॲड. सुषमा बोरसे, ॲड. चित्रा फुगे, ॲड. काळभोर, नायर, लोढा व वकील बांधव उपस्थित होते.
बार असोसिएशन तर्फे न्यायाधीश यांचा फुलांच्या कुंड्या देऊन सत्कार करण्यात आला. तसेच या वृक्षारोपणासाठी पिंपरी चिंचवड महानगर पालिकेचे विशेष सहकार्य लाभले.