देश:”कुटुंबाला वाचवणे हे विरोधकांचे एकमेव ध्येय..विरोधकांच्या बैठकीवर नरेंद्र मोदींची घणाघाती टीका
लोकसभा निवडणुकीपूर्वी सर्व विरोधक भाजपविरोधात एकवटले आहेत.अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पोर्ट ब्लेअरमधील आंतरराष्ट्रीय विमानतळ उद्घाटन प्रसंगी केली.
आज बंगळुरू येथे विरोधकांची बैठक आहे,आणि या बैठकीत देशभरातील दिग्गज विरोधी नेते सहभागी झाले आहेत. विरोधकांच्या बैठकीवर पंतप्रधान नरेंद्र यांनी टीका केली आहे. यावेळी ते म्हणाले,
‘कुटुंबाला वाचवणे हे विरोधकांचे एकमेव ध्येय आहे. विरोधकांची ही बैठक म्हणजे ‘एक चेहरे पे कई चेहरे है’, अशी दिसते.विरोधी पक्षांच्या ऐक्याबाबत बंगळुरूमध्ये झालेल्या बैठकीला पंतप्रधान मोदींनी टोला लगावला. विरोधकांवर खरपूस समाचार घेत ते म्हणाले की, विरोधी पक्ष त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना लाभदायक कामांनाच प्राधान्य देत असतो. यामुळे आदिवासी भागातील लोक विकासापासून वंचित राहीले.काँग्रेसवर निशाणा साधताना पंतप्रधान मोदी म्हणाले, काही पक्षांच्या स्वार्थी राजकारणामुळे विकासाचे फायदे देशाच्या दूरवरच्या भागात पोहोचले नाहीत.यादरम्यान राहुल गांधी, एमके स्टॅलिनपासून लालू यादवांपर्यंत सर्वांवर नरेंद्र मोदी यांनी हल्लाबोल केला. भ्रष्टाचाराची या लोकांना प्रचंड ओढ आहे. हे लोक कुटुंबवादाचे कट्टर समर्थक आहेत. बंगळुरू मध्ये सर्भ भ्रष्टाचारी लोक एकत्र आले असल्याची टीका मोदी यांनी केली.