लोणावळ्यात पावसाची जोरदार हजेरी-२४ तासांत २१२ मिलिमीटर पावसाची नोंद
राज्यात सर्वत्र पावसाचा जोर वाढला असून मावळ,तसेच लोणावळा परिसरात दिवसभर पावसाची संततधार सुरुच होती.लोणावळा, खंडाळा परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली असून मंगळवारी (ता.१८) सकाळी चोवीस तासांत २१२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
गेल्यावर्षीच्या तुलनेत पावसाला सरासरी गाठता आली नाही. यंदा केवळ एक हजार ५२४ मिलिमीटर पाऊस नोंदला गेला आहे. मात्र,पावसाचा जोर पुन्हा वाढू लागला आहे.पर्यटकांचे सर्वाधिक पसंतीचे व तुलनेत कमी क्षमतेचे भुशी धरण भरले असून, परिसरातील धबधबेही बहरल्याने ओसंडून वाहू लागले आहे. इंद्रायणी नदीच्या पातळीतही कमालीची वाढ झाली आहे. शहरासह कुरवंडे, कुसगाव बु., डोंगरगाव, औंढे, औंढोली, कार्ला, वेहेरगाव परिसरात रात्रभर जोरदार पाऊस सुरू आहे. ओढे-नाले दुथडी भरून वाहत आहे.
या जोरदार पावसामुळे शहरातील सखल भागात पाणी तुंबण्याचे प्रमाणही वाढले आहे. अनधिकृत, नियोजनशून्य वाढती बांधकामे, तसेच बेकायदा भरावांमुळे ओढे-नाल्यांचे बदललेले प्रवाह यामुळे कुसगाव, कार्ला, मळवली भागातील अनेक सोसायट्यांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांची तारांबळ उडाली