November 29, 2023
PC News24
जीवनशैली

पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांना ‘सूर्यभूषण राष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान

पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांना ‘सूर्यभूषण राष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान

आधुनिक साधनांचा वापर करताना दक्षता व सतर्कता हा सरंक्षणाच मंत्र ध्यानात ठेवल्यास होणारी फसवणूक टाळता येईल.आजकाल

दैनंदिन व्यवहारांचे स्वरूप बदलले त्यात तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे.पण यासोबतच सायबर गुन्हेगारी आणि फसवणूकही वाढली आहे.सोशल मीडिया,डिजिटल उपकरणांचा वाढता वापर होत असल्याने आर्थिक व्यवहार करताना सर्वांनीच काळजी व सावधगिरी बाळगावी. कोणत्याही प्रलोभनांना बळी न पडता महत्वाचे पासवर्ड, पिन, ओटीपी शेअर करू नयेत,” असा सल्ला पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी दिला.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय व सदाबहार सिनिअर्स संघ बावधन यांच्या संयुक्त विद्यमाने बावधन येथील सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्समध्ये ज्येष्ठ नागरिक सहायता मेळाव्याचे नुकतेच आयोजन करण्यात आले.

ज्येष्ठ नागरिकांना कायदेविषयक मार्गदर्शन व मदत, एकाकी जगणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची काळजी व सेवा, फसवणूक टाळण्यासाठी घ्यावयाची दक्षता, समस्याचे निराकरण व ज्येष्ठ सहायता संघाची प्रभावी मदत हा या कार्यक्रमाचा उद्देश्य होता.

‘सूर्यदत्त’च्या वतीने चौबे यांना लोकसेवेतील उत्कृष्ट कार्याबद्दल ‘सूर्यभूषण राष्ट्रीय पुरस्कार 2023’ने सन्मानित करण्यात आले. भारताचा नकाशा असलेले सन्मानचिन्ह, विद्यार्थ्यांनी बनवलेला विशेष स्कार्फ, सुवर्णपदक व प्रमाणपत्र असे या सन्मानाचे स्वरूप आहे.

सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनच्या उपाध्यक्ष व सूर्यदत्त वूमेन एम्पॉवरमेंट लीडरशिप अकॅडमीच्या अध्यक्षा सुषमा चोरडिया आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अक्षित कुशल यांच्या हस्ते हा सन्मान प्रदान करण्यात आला.

यापूर्वी हा पुरस्कार माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, शास्त्रज्ञ डॉ. के. सिवन, सामाजिक कार्यकर्ते वजुभाई वाला, लेफ्ट. जनरल डॉ. दत्तात्रय शेकटकर, केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत, श्याम जाजू, खासदार सुप्रिया सुळे, पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, डॉ. श्रीरंग लिमये, डॉ. शकुंतला काळे, पोलीस अधिकारी संजय जाधव, चंद्रशेखर सावंत, डॉ. चंद्रकांत कोकाटे या मान्यवरांना प्रदान करण्यात आला आहे.

यासह पिंपरी चिंचवडचे पोलीस सहआयुक्त संजय शिंदे, पोलीस उपायुक्त डॉ. काकासाहेब डोळे, सहायक पोलीस आयुक्त डॉ. विशाल हिरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांना उत्कृष्ट प्रशासकीय सेवेबद्दल, सदाबहार सिनिअर्स संघाचे अध्यक्ष नीलकंठ बजाज, बावधन सिटीझन फोरमचे समन्वयक सी. एस. कृष्णन, सदाबहार सिनिअर्स संघाच्या उपाध्यक्ष वीणा मुरगुडकर, सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र खळदकर, आध्यात्मिक मार्गदर्शक आशा देशपांडे यांना ज्येष्ठ नागरिकांच्या सेवा कार्याबद्दल, तर माजी नगरसेवक किरण दगडे पाटील, दिलीप वेडे पाटील यांना उत्कृष्ट समाजसेवेबद्दल ‘सूर्यगौरव राष्ट्रीय पुरस्कार 2023’ प्रदान करण्यात आला. सहायक पोलीस निरीक्षक गणेश खारगे, पोलीस उपनिरीक्षक यशवंत साळुंके यांचाही सन्मान करण्यात आला.

Related posts

भोसरीतील गायत्री इंग्लिश स्कूलचा आदर्शवत उपक्रम!!

pcnews24

‘सायकल चालवा-पर्यावरण वाचवा‘ जी – 20 परिषदेचे निमित्त

pcnews24

आजचे आपले राशीभविष्य !

pcnews24

सिंधी भाषिकांसाठी अनोखी कार्यशाळा !!!

pcnews24

मेड इन इंडिया आयफोन, लॅपटॉप लवकरच उपलब्ध

pcnews24

pcnews24

Leave a Comment