राष्ट्रीय ललित कला अकादमीच्या जागा हस्तांतरासाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर — आमदार महेश लांडगे
पिंपरी-चिंचवडमधील १५ एकर जागेत साकारणार अकादमी
पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या ताब्यात असलेली प्रस्तावित जागा राष्ट्रीय ललित कला अकादमीकडे हस्तांतरीत करून अकादमीच्या कामाला गती द्यावी,अशी महत्वाची मागणी आमदार महेश लांडगे यांनी केली आहे.
याबाबतचे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की राष्ट्रीय ललित कलांचे संगोपन, प्रसार आणि संशोधन करणा-या केंद्र सरकारच्या राष्ट्रीय ललित कला अकादमीचे प्रादेशिक केंद्र पिंपरी-चिंचवडमध्ये स्थापन करण्यास केंद्र सरकार कडून मान्यता मिळाली आहे ही आम्हा पिंपरी-चिंचवडकरांसाठी निश्चितच अभिमानाची बाब आहे
पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील भोसरी एमआयडीसी जे- ब्लॉक मोकळी जागा क्रमांक २९ येथील आरक्षण क्र. ४५ ही जागा बांधकामासह राष्ट्रीय ललित कला अकादमीस हस्तांतरित करण्यासाठी महापालिका प्रशासनाने एमआयडीसीच्या ताब्यात दिली आहे. सदर जागेची मूळ मालकी एमआयडीसीची आहे. एमआयडीसीच्या सदस्य मंडळ बैठकीत मा. उद्योग मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली ३९२ व्या बैठकीत ठराव क्र. ६३९७ अन्वये भूखंड बांधकामासह ललित कला अकादमीच्या प्रकल्पाकरिता करारनामा रुपये १/- दराने वाटप करण्यास मंजुरी दिली आहे.आता पुढील काम वेगाने सुरू व्हावे असे मुख्यमंत्र्यांनाच साकडे घातले आहे.