November 29, 2023
PC News24
वाहतूक

‘ ट्रॅफिक वार्डनची वाढती अरेरावी थांबवा.’.. माजीनगरसेवक संदीप वाघेरे यांची आग्रही मागणी

‘ ट्रॅफिक वार्डनची वाढती अरेरावी थांबवा.’.. माजीनगरसेवक संदीप वाघेरे यांची आग्रही मागणी

पिंपरी चिंचवड शहरात वाहतुकीचा ताण वाढतच आहे,त्यासाठी वाहतूक पोलिसांच्या मदतीला ट्रॅफिक वार्डनची नेमणूक करण्यात आलेली आहे. शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत होऊन सर्वसामान्य नागरिकांना वाहतूक कोंडीचा होणारा त्रास कमी करणे हा यामागे उद्देश आहे. परंतु शहरतील ट्रॅफिक वार्डन वाहतूक सुरळीत करण्यापेक्षा नागरिकांचा छळ करीत असल्याचे चित्र बघायला मिळत आहेत.याबाबत माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांनी आयुक्तांना निवेदन दिले आहे.

याविषयी वाघेरे सांगितले की,शहरातील विविध भागांमध्ये सिग्नलवर उभ्या असणाऱ्या वाहनचालकांचा परवाना तपासणे,पी.यु,सी,

चेक करणे,गाडीच्या काचांवरील फिल्म चेक करणे, सीट बेल्ट लावला नाही तसेच इतर कागदपत्रांची मागणी करणे, अशा अनेक कारणाने वाहनचालकांना वेठीस धरून धाकाने दंडाची पावती वसूल केली जाते.

ही तपासणी स्वतः वाहतूक पोलीस करीत नसून ट्रॅफिक वार्डन कडून करीत असल्याची तक्रार अनेक नागरिकांनी केली आहे.

अनेकदा चालत्या वाहनांना अडवून हा प्रकार केला जात आहे.यामुळे एखादा मोठा अपघात होऊन जीवितहानी झाल्यास त्याला जबाबदार कोण ? असा सवालही उपस्थित होत आहे.

शहरातील शगुन चौक,

कोकणे चौक,वाकड ब्रिज,फिनोलेक्स चौक.

खंडोबा माळ चौक,

के.एस.बी.चौक,भोसरी चौक अश्या वर्दळीच्या ठिकाणी हे प्रकार सर्रास घडत आहे.

शगुन चौक व वाकड ब्रीज् येथे तर अनेकदा हे ट्रॅफिक वार्डन दबा धरून उभे असतात,एखादे वाहन पुलावरून आले कि लगेच त्याला अडवायचे,वाहनचालकाने कागदपत्रे दाखवण्यास टाळाटाळ केल्यास अथवा तुझा काय संबध कशी विचारणा केल्यास थेट त्यांच्या वाहनाची किल्ली काढून घेतली जाते. एखाद्या वाहनाला किती दंड आकारायचा हे सुद्धा ट्रॅफिक वार्डनच ठरवतात.असे प्रकार नित्याचेच झाले त्यामुळे मुजोरी करणाऱ्या ट्रॅफिक वार्डनची अरेरावी ताबडतोब थांबवली गेली पाहिजे,शिवाय या कामचुकार ट्रॅफिक वार्डन वर त्वरित कारवाई करण्यात यावी अशी आग्रही मागणी वाघेरे यांनी आयुक्तांकडे केली आहे .

Related posts

मोशी:स्कूलबसमध्ये ९२ विद्यार्थी;मोशीतील ‘एक्सलन्स स्कूल’ मधील धक्कादायक प्रकार.

pcnews24

‘पुणे वन कार्ड’ होणार मल्टिपर्पज.

pcnews24

भरावा लागेल 25 हजारांचा दंड!!अल्पवयीन मुलांच्या हाती गाडी देताना विचार करावा.

pcnews24

पुणे – लोणावळा – पुणे लोकलच्या चार फेऱ्या रद्द , सोमवार (दि.26) ते बुधवार (दि.29) रेल्वेचा इंजिनिअरिंग ब्लॉक

pcnews24

पिंपरी चिंचवड:खासगी प्रवासी बसेसवर पिंपरी चिंचवड आरटीओ कडून कारवाई…मोहिमे अंतर्गत मोठी दंड वसुली.

pcnews24

पुणे:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मेट्रोच्या तीन मार्गांचे उद्घाटन- १ऑगस्ट पासून,पुणे-पिंपरी चिंचवड शहरे मेट्रोने जोडली जाणार

pcnews24

Leave a Comment