मुंबई:हातून निसटलेले 4 महिन्याचे बाळ वाहून गेले
हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. मुसळधार पावसामुळे अंबरनाथ लोकल ठाकुर्ली आणि कल्याण स्थानकांदरम्यान 2 तास उभी होती. त्यावेळी वैतागलेले काही प्रवाशी रेल्वे गाडीतून उतरत पायी निघाले. तेव्हा चालत असताना एका व्यक्तीच्या हातून चार महिन्याचे बाळ सटकले आणि वाहत्या पाण्यात वाहून गेले. यावेळी आईच्या आक्रोशाने उपस्थित लोकांचे मन सुन्न झाले.