मुंबई:शरीरसौष्ठवपटू आशिष साखरकर यांचं निधन
बॅाडीबिल्डिंग विश्वातील एक अत्यंत मोठं नाव असलेले मराठमोळे बॉडीबिल्डर आशिष साखरकर यांचे आज दुःखद निधन झाले.गेल्या काही दिवसां पासून आशिष एका आजाराशी झुंज देत होते अखेर त्यातच साखरकरांचे निधन झाले. महाराष्ट्र श्री पासून मिस्टर इंडिया, मिस्टर युनिव्हर्स पर्यंतचे अनेक पुरस्कार आपल्या नावावर केलेले आशिष यांनी देश-विदेशात अनेक स्पर्धा जिंकत भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला होता. आशिष साखरकर यांनी ४ वेळा मिस्टर इंडिया विजेतेपद,४ वेळा फेडरेशन कप विजेतेपद,
मिस्टर युनिव्हर्स रौप्य आणि कांस्य,तसेच मिस्टर आशिया रौप्य,युरोपियन चॅम्पियनशिप,
शिवछत्रपती पुरस्कार पटकावले होते.जगभरात कीर्ती मिळवलेले मराठमोळे शरीरसौष्ठवपटू आणि बॅाडीबिल्डिंग विश्वातील एक अत्यंत मोठं आणि मानाने घेतलं जाणारं नाव अशी आशिष साखरकर यांची ओळख होती.
मिस्टर इंडिया ही उपाधी अभिमानाने सार्थ ठरवणारे व्यक्तिमत्व आशिष साखरकर अशी भावना त्यांच्या चाहत्यांनी व्यक्त केली आहे. साखरकर केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात एक आयकॉन मानले जात असत. आशिष साखरकर यांच्या शेवटच्या इन्स्टाग्राम पोस्टवर त्यांचे असंख्य चाहते आणि मित्र मंडळी श्रद्धांजली अर्पण करत आहेत.आज त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाले.