पुणे-मुंबई दरम्यान धावणाऱ्या महत्वाच्या गाड्या मुसळधार पावसामुळे गुरुवारी बंद
मुंबई परिसरात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांत पाणी साचले आहे. रेल्वे मार्ग देखील पाण्याखाली गेल्याने पुणे-मुंबई दरम्यान धावणाऱ्या दहा महत्वाच्या रेल्वे गुरुवारी (दि. 20) रद्द करण्यात आल्या आहेत.
मुंबई पाठोपाठ घाट परिसरात देखील मोठ्या स्वरुपात पाऊस पडत आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने पुणे-मुंबई दरम्यान धावणाऱ्या दहा रेल्वे गुरुवारी रद्द केल्या आहेत.
पुणे ते मुंबई दरम्यान रद्द केलेल्या ट्रेन्स
डेक्कन क्वीन (12124)
सिंहगड एक्सप्रेस (11010)
डेक्कन एक्सप्रेस (11008)
इंटरसिटी एक्सप्रेस (12128)
इंद्रायणी एक्सप्रेस (22106)
मुंबई ते पुणे दरम्यान रद्द केलेल्या ट्रेन्स
डेक्कन क्वीन (12123)
सिंहगड एक्सप्रेस (11009)
डेक्कन एक्सप्रेस (11007)
इंटरसिटी एक्सप्रेस (12127)
इंद्रायणी एक्सप्रेस (22105)