February 24, 2024
PC News24
राजकारण

NCP(अजित पवार गट)पिंपरी-चिंचवड शहराध्यक्षपदी अजित गव्हाणे यांची निवड

NCP(अजित पवार गट)पिंपरी-चिंचवड शहराध्यक्षपदी अजित गव्हाणे यांची निवड

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आज संघटनात्मक पदाच्या निवडी जाहीर केल्या त्यात पिंपरी-चिंचवड शहराध्यक्षपदी ज्येष्ठ माजी नगरसेवक अजित गव्हाणे यांची निवड करण्यात आली आहे तर राहूल भोसले, शाम लांडे, जगदीश शेट्टी, प्रशांत शितोळे, फजल शेख यांची कार्याध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे.

 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटनात्मक निवडी सुरू केल्या आहेत. शहरातील राष्ट्रवादीच्या बहुतांशी सर्वच आजी-माजी नगरसेवकांनी अजित गव्हाणे यांच्या नेतृत्त्वाखाली अजित पवार यांना पाठींबा जाहीर केला होता. त्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आज शहरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या निवडी मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात जाहीर केल्या आहेत. यावेळी माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, माजी नगरसेवक पंकज भालेकर, राहूल भोसले, शाम लांडे, प्रभाकर वाघेरे, प्रसाद शेट्टी व इतर मान्यवर उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात राष्ट्रवादीची ताकद वाढविण्या बरोबरच राज्य शासनाच्या माध्यमातून शहर विकासाची अधिकाधिक कामे मार्गी लावण्याचा आमचा प्रयत्न असेल.पिंपरी-चिंचवडकरांचे प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही कटीबद्ध रहाणार असे गव्हाणे यांनी सांगितले.

Related posts

सूरत कोर्टाने राहुल गांधीना दिलेल्या शिक्षेवर स्थगिती.

pcnews24

महाराष्ट्र:राज्यात जे घडतंय तो मतदारांचा अपमान : राज ठाकरे

pcnews24

‘रेल्वेमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी अयोग्य’ : एच.डी.देवेगौडा.

pcnews24

‘भाजपमुक्त महाराष्ट्र करण्याचा निर्धार’- नाना पटोले.

pcnews24

लोक माझे सांगाती पवारांचे ठाकरेंवर टीकास्त्र…

pcnews24

साने गुरुजी तरुण मंडळाच्या गणपतीच्या मांडवाला आग;जे पी नड्डा आरतीसाठी आले होते

pcnews24

Leave a Comment