March 1, 2024
PC News24
हवामान

आळंदी येथील भक्ती सोपान पूल पाण्याची पातळी वाढल्याने रहदारीस बंद.

आळंदी येथील भक्ती सोपान पूल पाण्याची पातळी वाढल्याने रहदारीस बंद.

मावळ भागात व धरण क्षेत्रात संततधार पाऊस सुरू असल्याने आळंदी येथील इंद्रायणी नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. इंद्रायणी नदीपात्रातील पाण्याची पातळी वाढल्याने भक्ती सोपान पूल नागरिकांच्या रहदारीसाठी बंद करण्यात आला आहे.

आळंदी येथील सिध्दबेट येथील जुना बंधारा पूर्ण पणे भरून त्यावरून पाणी नदीपात्रात पडत आहे. पिंपरी चिंचवड पालिकेच्या वतीने सिध्दबेट जवळील बंधाऱ्या मधील नदीपात्रातील जलपर्णी काढण्याचे कार्य सुरू आहे त्यासाठी बोट व कर्मचारी काम करीत आहेत तसेच गरुड स्तंभ पुलाजवळील बंधाऱ्यातील जलपर्णी पोकलँडच्या सहाय्याने काढण्याचे कार्य देखील सुरू आहे.

Related posts

नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे महापालिका आयुक्तांचे आवाहन.

pcnews24

बुधवारी पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरात सोसाट्याच्या वाऱ्यासह काही भागात गारपीट, अनेक ठिकाणी नुकसान.

pcnews24

लोणावळ्यात पावसाची जोरदार हजेरी-२४ तासांत २१२ मिलिमीटर पावसाची नोंद.

pcnews24

आसाममधील पूर परीस्थिती गंभीर.

pcnews24

मुसळधार! लोणावळा शहरात 24 तासात 273 मिमी विक्रमी पावसाची नोंद.

pcnews24

१० जणांना मृत्यू,मराठवाड्यात अवकाळी पावसाचा हाहाकार.

pcnews24

Leave a Comment