February 24, 2024
PC News24
अपघात

रायगड जिल्ह्यात भूस्खलनाने दरड कोसळल्याची घटना, मुख्यमंत्री घटना स्थळी दाखल.

रायगड जिल्ह्यात भूस्खलनाने दरड कोसळल्याची घटना, मुख्यमंत्री घटना स्थळी दाखल.

बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरु

रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडीवर ( इर्शाळगड) रात्री साडेदहा ते अकरा वाजण्याच्या सुमारास भूस्खलनाने दरड कोसळल्याची घटना घडली. या गावात 50 ते 60 घरांची वस्ती असून जवळपास 200 ते 300 लोकांची वस्ती आहे.. मातीच्या ढिगाऱ्याखाली अंदाजे 30 ते 40 घरातील लोक अडकल्याची माहिती मिळाली आहे. यापैकी 25 जणांना वाचवण्यात आले आहे.

 

एकनाथ शिंदे घटनास्थळाकडे रवाना

रायगडमध्ये दरड कोसळल्याची दुर्घटना घटना समजताच या ठिकाणाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घटना स्थळाकडे रवाना झाले आहेत. सध्या घटनास्थळी मंत्री उदय सामंत, गिरीश महाजन, दादा भूसे याठिकाणी उपस्थित आहेत.. ते सर्वांना थांबण्याचे आवाहन करत आहेत. इरशाळवाडी या गावात ही घटना घडली. प्रशासन रेस्क्यू करण्याचे प्रयत्न करत आहे. बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरु आहेत. घटनेत 4 जणांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे.इर्शाळवाडी दरड कोसळल्याचे थरारक फोटो

रायगडमधील खालपूरच्या इर्शाळवाडीवर दरड कोसळली आहे. रात्री 11 च्या सुमारास दरड कोसळल्याची घटना घडली. या घटनेत 50 घरांवर डोंगराचा ढिगारा कोसळला आहे. यात 15 ते 20 लहान मुलांसह 100 पेक्षा अधिक लोक हे मातीच्या ठिगाऱ्याखाली अडकले आहेत. या घटनेचे भयंकर थरारक फोटो समोर आले आहेत.मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांची माहिती.

मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील रात्री अकरा वाजता ही घटना घडल्याचे सांगितले . जिल्हाधिकारी आणि संबंधित सर्व अधिकारी रात्रीच घटनास्थळी पोहोचले होते. लष्करी टीमला कळवण्यात आले आहे. NDRF च्या टीम घटनास्थळी दाखल झाल्या.काही क्षणात स्वतः घटनास्थळाकडे जात असल्याचे ते म्हणाले. बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरु आहे. परंतु रात्री दाट धुके आणि अंधारामुळे काही काळ बचाव कार्य थांबवण्यात आले होते, असे त्यांनी सांगितले.

Related posts

जुनी सांगवी येथील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची रहिवाश्यांकडून मागणी.

pcnews24

अनाधिकृत होर्डिंग्जवर कारवाई कधी? हिंजवडीत महाकाय होर्डिंग कोसळले.

pcnews24

सरसकट कुणबी दाखले ही 96 कुळी मराठ्यांची मागणी नाही;नारायण राणे यांची रोखठोक भूमिका

pcnews24

ओडिशात 3 गाड्या रुळावरून घसरल्याने 50 पेक्षा जादा ठार, 350 पेक्षा जास्त जखमी

pcnews24

भरधाव बसची दोन्ही चाकं निखळली, नक्की काय घडला प्रकार.

pcnews24

पुणे नाशिक महामार्गावर धावत्या शिवशाही बसला आग..सर्व प्रवासी सुखरूप

pcnews24

Leave a Comment