February 24, 2024
PC News24
हवामान

मुसळधार! लोणावळा शहरात 24 तासात 273 मिमी विक्रमी पावसाची नोंद.

मुसळधार! लोणावळा शहरात 24 तासात 273 मिमी विक्रमी पावसाची नोंद.

घाटमाथा आणि निसर्ग पर्यटनासाठी प्रसिध्द असलेल्या लोणावळा शहरात बुधवारी (19 जुलै) 24 तासात 273 मिमी (10.75 इंच) इतक्या विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. यावर्षीच्या हंगामातला हा सर्वाधिक पाऊस आहे. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर लोणावळा शहरातील सर्व शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. हवामान विभागाने पुढील दोन ते तीन दिवस जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. मागील तीन दिवसात शहरात तब्बल 705 मिमी पाऊस झाला आहे.

लोणावळा धरणाच्या पायथ्याजवळ मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर खंडाळा येथे सातु हाॅटेलसमोर पाण्याची मोरी बंद केल्याने मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे तसेच खंडाळ्यातील पोस्ट कार्यालयाच्या मागील पुलाखाली मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे.

मावळा पुतळा चौकात मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून दुकानांच्या जोत्याला पाणी लागले आहे. शहानी रोड, बस स्थानकाच्या बाहेरील रस्ता, बाजारातील रस्ते, रायवुड भागातील रस्ते, नांगरगाव वलवण रस्त्यावर पाणी साचले आहे. आर्दश काॅलनी नांगरगाव समोरील मुख्य रस्ता कालपासून पाण्याखाली गेला असून सोसायटीमधे देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे.

Related posts

रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा या जिल्ह्यांना रेड अलर्ट

pcnews24

पुणे जिल्हा:जोरदार पावसाने पवना धरण ५१ टक्के भरले…पण शहरवासीयांना पाण्याची प्रतिक्षाच.

pcnews24

महाराष्ट्र तापला-ऑगस्ट कोरडा, सप्टेंबर महिन्यावर आशा केंद्रित,शनिवारपासून पावसाची जोरदार हजेरी. 

pcnews24

‘मोचा’ चक्रिवादळ दुपारी धडकणार, मुसळधार पाऊस

pcnews24

ओव्हरफ्लो! पवना धरणातून ३५०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू-नागरिकांना सतर्कतेचा इशारा

pcnews24

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी; खडकवासला धरण 100 टक्के.

pcnews24

Leave a Comment