February 24, 2024
PC News24
गुन्हा

पुण्यात घातपाताची शक्यता?एनआयए,आणि एटीएस सतर्क.

पुण्यात घातपाताची शक्यता?एनआयए,आणि एटीएस सतर्क

सोमवारी मध्यरात्री गस्त घालत असताना,कोथरूड पोलिस ठाण्यातील शिपाई प्रदीप चव्हाण आणि अमोल नजन कोथरूडमधील शास्त्रीनगर परिसरात तिघे जण दुचाकी चोरण्याच्या तयारीत दिसले. संशयावरून खान आणि साकी यांना ताब्यात घेण्यात आले आहे.’एनआयए’ शोध घेत असलेल्या दोघा दहशतवाद्यांना पुणे पोलिसांच्या पथकाने अटक केली.साकी आणि खान ‘इस्लामिक स्टेट’ या दहशतवादी संघटनेची उपसंघटना ‘सुफा’शी संबधित असून, ते जयपूर येथे घातपात घडवण्याच्या तयारीत होते, अशी माहिती प्राथमिक तपासात मिळाली आहे. दोघा दहशतवाद्यांचा म्होरक्या महंमद शहनवाज आलम (वय ३१) हा फरारी असल्याची माहिती पोलिसांना तपासात मिळाली आहे. त्यामुळे तिघे दहशतवादी पुण्यात काही घातपात घडविणार होते का या दृष्टीने तपास करण्यात येत आहे, स्थानिक पोलिसांसह राष्ट्रीय तपास यंत्रणा(एनआयए) आणि राज्य दहशतवादी विरोधी पथक (एटीएस) या यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.आलमचा शोध घेत असून ‘एनआयए’ आणि ‘एटीएस’ या प्रकरणाचा समांतर तपास करणार आहेत.

‘एनआयए’ने स्फोटके बाळगल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केले होते, दीड वर्षांपासून ते कोंढव्यात वास्तव्यास होते. आलम याच्या इशाऱ्यावर साकी आणि खान काम करीत असल्याचा संशय आहे. आलम याचे नाव या प्रकरणात पहिल्यांदाच समोर आल्याने सर्व यंत्रणा कसून शोध घेत आहेत.

साकी आणि खान ग्राफिक्स डिझायनर म्हणून कामाच्या बहाण्याने विविध ठिकाणी वावरत होते, हे तिघे पुण्यात कोणाच्या संपर्कात होते, या दृष्टीने तपास करण्यात येत आहे. राज्य दहशतवाद विरोधी पथकाने गेल्या वर्षी कोंढव्यात छापा टाकून बंदी असलेल्या ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’च्या (पीएफआय) दोघांना अटक केली होती; तसेच दापोडीतून जुनैद महंमद अता महंमद याला अटक केली होती. पुण्यात सतत संशयित दहशतवादी सापडत असल्याने आणि पूर्वी अतिरेकी हल्ले झाल्याने पुण्याला दहशतवाद्यांकडून धोका आहे का, हा प्रश्न उपस्थित झाला आहे.

महंमद साकी आणि महंमद खान यांच्या कोंढव्यातील घरी ड्रोनचे साहित्य सापडल्याने हे दहशतवादी ड्रोनच्या साह्याने काही घातपात करणार होते का, या दृष्टीने तपास करण्यात येत आहे. या दहशतवाद्यांच्या रडारवर पुणे शहर होते का, या दृष्टीनेही यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. दोघा दहशतवाद्यांची चौकशी करण्यात येत आहे. प्रकरण गंभीर असल्याने बारकाईने तपास करावा लागणार आहे, अशी प्रतिक्रिया वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली

Related posts

दहशतवाद्यांनी जंगलात केली बॉम्बस्फोटाची चाचणी- एटीएस पथकाची माहिती

pcnews24

पुण्यातल्या वारजे परिसरात दिवसाढवळ्या गोळीबार, एक जखमी

pcnews24

वानवडी :रिक्षाचालकाचा तरुणीवर बलात्काराचा प्रयत्न : वानवडी येथील घटना

pcnews24

पिंपरी चिंचवड:शहरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा, अन्यथा राजीनामा द्या.

pcnews24

पुणे: पोलीस अकादमीमध्ये एकत्र शिकत असलेल्या अल्पवयीन मुलीवर सहकाऱ्या कडूनच अत्याचार

pcnews24

पिंपरी:वकिलाची झाली एक कोटी 37 लाखाची फसवणूक..जमीन खरेदी व्यवहाराचे आमिष.

pcnews24

Leave a Comment