February 24, 2024
PC News24
हवामान

पुणे जिल्हा:जोरदार पावसाने पवना धरण ५१ टक्के भरले…पण शहरवासीयांना पाण्याची प्रतिक्षाच.

पुणे जिल्हा:जोरदार पावसाने पवना धरण ५१ टक्के भरले…पण शहरवासीयांना पाण्याची प्रतिक्षाच

पिंपरी : मागील पाच दिवसांपासून धरण क्षेत्रात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे पिंपरी-चिंचवडकरांची तहान भागविणारे पवना धरण ५१ टक्के म्हणजे निम्मे भरले आहे. पुढील सहा महिने पुरेल एवढा हा पाणीसाठा आहे. मात्र, महापालिकेने दिवसाआड पाणीपुरवठ्याच्या निर्णयात बदल केला नाही त्यामुळे शहरवासीयांना दररोज होणाऱ्या पाणी पुरवठ्याची आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.मागील पाच दिवसांपासून पावसाने पवना धरण पाणलोट क्षेत्रात दमदार हजेरी लावली. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली.

पिंपरी-चिंचवड,तसेच मावळ भागातील विविध गावांना पवना धरण हाच पाण्याचा मुख्य स्रोत आहे. मात्र जून अखेर पावसाने ओढ दिल्याने धरणातील पाणीसाठा १७ टक्क्यांवर आला होता. मावळातील आंद्रा, वडिवळे, टाटा या छोट्या धरणांमधील पाणीसाठ्याने तळ गाठायला सुरुवात केली होती. जूनपासून धरण परिसरात एक हजार १० मिमी पावसाची नोंद झाली. तर, पाणीसाठ्यात ३३.४४ टक्क्यांनी वाढ झाली. धरणातील पाणीसाठा ५१.४३ टक्क्यांवर पोहोचला आहे. पुढील सहा महिन्यांचा पाण्याचा प्रश्न मिटला असून, आता शहरवासीयांना दररोज पाणीपुरवठ्याची प्रतीक्षा आहे.

Related posts

मुंबई:पावसाने मुंबईमध्ये विविध ठिकाणी ऐलर्ट!! 

pcnews24

मावळ:पवना धरण 77.80 टक्क्यांवर; गेल्या 24 तासात 115 मिमी पाऊस.

pcnews24

रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा या जिल्ह्यांना रेड अलर्ट

pcnews24

लोणावळ्यात पावसाची जोरदार हजेरी-२४ तासांत २१२ मिलिमीटर पावसाची नोंद.

pcnews24

मान्सून चे अंदमान परिसरात आगमन

pcnews24

महाराष्ट्र :हवामान खात्याचा २९ जूनला ऑरेंज अलर्ट,राज्यात अतिवृष्टीचा इशारा.

pcnews24

Leave a Comment