February 24, 2024
PC News24
सामाजिक

निगडी:शॉर्टकट बेतला असता जीवावर?..अग्निशमन विभागाकडून सुखरूप सुटका

निगडी:शॉर्टकट बेतला असता जीवावर?..अग्निशमन विभागाकडून सुखरूप सुटका

राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. पिंपरी- चिंचवड शहर आणि परिसरातही पावसाचा जोर कायम आहे. रस्त्यातील खड्ड्यांप्रमाणेच अनेक ठिकाणी चिखल दलदल तयार झाली आहे.

निगडी- प्राधिकरण येथील मूक-बधिर शाळेच्या पाठीमागे दलदलीत फसलेल्या व्यक्तीला सुखरूप बाहेर काढण्यात अग्निशमन विभागाला यश आलं आहे. आज सकाळी साडेसातच्या सुमारास निगडी एक व्यक्ती दलदलीत फसल्याची माहिती अग्निशमन विभागाला मिळाली. अग्निशमन विभागाने तात्काळ दखल घेऊन त्या व्यक्तीची सुखरूप सुटका केली आहे.

निळकंठ पाटील असे या नावाची ही व्यक्तीचे नाव असून त्यांच्या घराजवळील शाळेच्या मागे असलेल्या जवळच्या रस्त्याने ते जात होते. मात्र मुसळधार पावसामुळे झालेल्या दलदलीत ते फसले. ही घटना बघितल्यानंतर विशाल साळवे या व्यक्तीने ही माहिती निगडी अग्निशमन विभागाला दिली. तात्काळ अग्निशमन दलाचे जवान त्या ठिकाणी दाखल झाले. घटनास्थळाची पाहणी करून दोर, शिडी आणि हुकच्या साह्याने निळकंठ पाटील यांना सुखरूप बाहेर काढले.मोकळ्या मैदानात चिखल असलेल्या ठिकाणी अशा घटना घडत असल्याचं समोर येत आहे.

Related posts

शून्य कचरा संकल्पना स्पर्धेत महिंद्रा रॉयल हाउसिंग सोसायटीला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक

pcnews24

नितीन गडकरींची भुमिका साकारणार ‘हा’ अभिनेता

pcnews24

आर्यन्स मार्शल आर्ट्स संघाला विजेतेपद !!

pcnews24

मराठा आंदोलनामुळे प्रवाशांना मनस्ताप तर STचे १५ कोटींचे नुकसान

pcnews24

पिंपरी:संत तुकाराम नगर येथे भव्य “गरबा व दांडिया” स्पर्धा संपन्न

pcnews24

पुणे शहरात ऑल आउट ऑपरेशन नं. २, स्वत: पोलिस आयुक्त रितेश कुमार आणि पोलिस सहआयुक्त संदीप कर्णिक अँक्शन मोड मध्ये, नक्की विषय काय?

pcnews24

Leave a Comment