February 24, 2024
PC News24
गुन्हा

पंजाब:अवघ्या सात दिवसात ‘प्रेमविवाहाची ‘ अखेर विष पिऊन.. नवरदेवाचे टोकाचं पाऊल.

पंजाब:अवघ्या सात दिवसात ‘प्रेमविवाहाची ‘ अखेर विष पिऊन.. नवरदेवाचे टोकाचं पाऊल

 

प्रेमात पडलेले प्रेमवीर आयुष्यभर कोणत्याही परिस्थितीत अतूट बंधनाचे वचन एकमेकांना देतात पण अवघ्या सात दिवसात एका प्रेमविवाहाची दुर्दैवी अखेर झाली. फक्त आठवड्याभरापूर्वी प्रेमविवाह केलेल्या एका नवरदेवाने विष पिऊन जीवन संपवलं आहे.त्याचा मृतदेह कारमध्ये सापडला,कारमध्ये विषाची काही पाकिटं सापडली आहेत. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

पंजाबच्या पटियाला जिल्ह्यातील बनूड परिसरात राहणारा नवरदेव दिलप्रित सिंगने लग्नाच्या अवघ्या सात दिवसांनंतर जीव दिल्याची घटना घडली आहे. याचे कारण पत्नी आणि सासूच्या त्रासाला कंटाळून त्यानं हे टोकाचं पाऊल उचलल्याचं सांगितले जात आहे.

पोलिसांनी दिलप्रितचा मृतदेह ताब्यात घेत तो शवविच्छेदनासाठी पाठवला.दिलप्रितचे वडील बलविंदर सिंग यांनी सून मनप्रित कौर आणि तिची आई कुलदीप कौर यांच्यामुळेच आपल्या मुलानं आत्महत्या केल्याचा आरोप केला आहे.या दोघांविरोधा पोलीसात तक्रार नोंदवली आहे.

आठवड्याभरापूर्वी दिलप्रित आणि मनप्रितचा विवाह झाला होता. मनप्रित जीरकपूरची रहिवासी आहे. ती बार अटेंडंटचं काम करते. एका लग्न सोहळ्यात दोघांची भेट झाली. त्यानंतर मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं आणि त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. दिलप्रित गावात राहायचा. मात्र लग्नानंतर मनप्रितनं गावी राहण्यास नकार दिला. यावरुन दोघांमध्ये वाद होते.वाद वाढल्यानंतर दिलप्रित मनप्रितसोबत त्याच्या सासूकडे राहण्यास गेला. मात्र सासू दररोज त्याचा पाणउतारा करायची. एके दिवशी तिनं शेजारपाजाऱ्यांसमोर जावयाचा अपमान केला. यात धक्कादायक बाब अशी की मनप्रितनंही आईला साथ दिली. अर्थातच यामुळे दिलप्रित नाराज झाला.हा अपमान सहन न झाल्याने इनोव्हा कारची चावी घेऊन तो घराबाहेर निघाला. १७ जुलैला त्याचा मृतदेह बनूड उड्डाणपुलाखाली कारमध्ये सापडला.

Related posts

रहाटणी: सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेनी केली आत्महत्या

pcnews24

दौंड: पत्नी व दोन मुलांचा खून करून डॉक्टरची आत्महत्या

pcnews24

क्रिप्टो करन्सी गुंतवणुकीच्या बहाण्याने 27 लाखांची फसवणूक.

pcnews24

तीन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडून 11 लाख 70 हजार रुपयांचा गांजा जप्त

pcnews24

निगडी-रुपीनगर येथे गाड्यांची तोडफोड करून दहशत.. कोयत्यांचा वापर

pcnews24

सततच्या टोमण्याला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

pcnews24

Leave a Comment