February 24, 2024
PC News24
अपघात

इर्शाळवाडी दरड दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढली.. 21 मृतदेह बाहेर;135 जण अजूनही बेपत्ता

इर्शाळवाडी दरड दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढली.. 21 मृतदेह बाहेर;135 जण अजूनही बेपत्ता

रायगड जिल्ह्यातील खालापूर जवळ इर्शाळवाडी गावात बुधवारी (दि. 19) दरड कोसळण्याच्या दुर्घटनेत आतापर्यंत 21 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अजूनही 135 जण अजूनही बेपत्ता आहेत. सुमारे 650 जण या बचाव कार्यात सहभागी झाले आहेत. हा परिसर अत्यंत दुर्गम ठिकाणी असल्याने तिथे जाण्यासाठी देखील अनेक अडचणी येत आहेत.

इर्शाळवाडी गावात 228 जण राहतात. त्यात सहा वर्षाखालील 25 मुले आहेत. दरड कोसळण्याची घटना घडत असताना 70 जण सुरक्षित ठिकाणी गेले. दरम्यान अनेक घरे दरडीखाली सापडली. दरडीखाली अडकलेल्या 80 जणांना गुरुवारी बाहेर काढण्यात आले. त्यातील 16 जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत 103 जणांना वाचविण्यात बचाव पथकांना यश आले आहे. तर शुक्रवारी आणखी दोन महिला आणि तीन पुरुष असे पाच जणांचे मृतदेह मिळाले आहेत. यामुळे या घटनेत मृतांची संख्या 21 झाली आहे. जखमी 21जणावर नवी मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Related posts

राजगड किल्ल्यावरील 25पर्यटकांवर मधमाशांचा हल्ला.

pcnews24

तळवडे : रस्ता ओलांडत असताना एका टेम्पोची धडक,कामगाराचा मृत्यू.

pcnews24

निष्काळजीपणे हॅन्ड ब्रेक न लावता कार कंटेनर पार्क केला आणि पुढे घडला अनर्थ

pcnews24

प्लंबरचा बांधकाम साईटवरून पडून दुर्दैवी मृत्यू…सुरक्षेच्या उपायांची कमतरता

pcnews24

गणेशोत्सवाच्या रोषणाईमुळे आग लागून तरुणाचा मृत्यू.

pcnews24

मोरवाडी चौकातील सिग्नलची निर्धारित वेळ वाढविण्याची मागणी.

pcnews24

Leave a Comment