February 24, 2024
PC News24
महानगरपालिका

महानगरपालिकेच्या मालमत्ता बिलातील उपयोगकर्ता शुल्क वसुलीस अखेर स्थगिती-आमदार महेश लांडगे यांनी मांडली प्रखर भूमिका.

महानगरपालिकेच्या मालमत्ता बिलातील उपयोगकर्ता शुल्क वसुलीस अखेर स्थगिती-आमदार महेश लांडगे यांनी मांडली प्रखर भूमिका.

आ महेश लांडगे यांच्या मागणीनुसार पिंपरी- चिंचवडमध्ये महापालिके कडून सुरू असलेली उपयोगकर्ता शुल्काच्या वसुलीला अखेर स्थगिती मिळाली आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये याबाबत सविस्तर बैठक घेण्यात येईल आणि तोपर्यंत ही वसुली थांबवावी, असा मोठा निर्णय मंत्री उदय सामंत यांनी घेतला. त्यामुळे सर्वसामान्य पिंपरी-चिंचवडकरांना दिलासा मिळाला आहे.

आमदार महेश लांडगे यांनी उपयोगकर्ता शुल्क रद्द करावे आणि वसुल केलेली दंडाची रक्कम रद्द करावी. या मागणीसाठी पावसाळी अधिवेशनामध्ये लक्षवेधी सादर केली आणि प्रखरपणे भूमिका मांडली. त्यामुळे राज्य सरकारला निर्णय घ्यावा लागला.

पिंपरी-चिंचवडमधील प्रामाणिकपणे मिळकतकर भरणाऱ्या नागरिकांवर २०१९ पासून २०२३ पर्यंत चार वर्षांचा उपयोगकर्ता शुल्क आकारण्यात आला. नवी मुंबई, ठाणे महापालिकेत हे शुल्क आकारले जात नाही, मग पिंपरी-चिंचवड शहरातच का लागू केला जातो.

चार वर्षांचा कर मिळकतकर पावतीमध्ये समाविष्ट केला आणि त्यावर दंड लावला, याबाबत सरकारने निर्णय घ्यावा.तसेच पर्यावरणपूरक सोसायटीधारक मिळकत धारकांना हा कर का लावला आहे? असा प्रश्न उपस्थित केला. ३ लाखांहून अधिक कुटुंबांवर लादलेला हे अतिरिक्त शुल्क रद्द करावे, अशी ठाम भूमिका आमदार लांडगे यांनी मांडली.

कॅबिनेट मंत्री उदय सामंत यांनी या विषयावर सभागृहात सकारात्मक भूमिका घेत पुढाकार घेतला. आमदार लांडगे यांनी प्रभावीपणे पिंपरी-चिंचवडचा मुद्दा मांडला. अन्य लक्षवेधींसाठी वेळ खर्ची झाल्याने त्यांची चिडचिड झाली. त्यांची पार्श्वभूमी पैलवान असल्यामुळे त्यांचे म्हणणे ऐकावेच लागेल’’ असा उल्लेख त्यांनी केला. सन २०१९ ते २०२३ असे चार वर्षांच्या उपयोगकर्ता शुल्क वसुलीचा हा विषय आहे. याबाबत राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची सविस्तर बैठक घेण्यात येईल. त्यानंतर नियम व अटींची पडताळणी करुन याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येईल. तोपर्यंत शुल्क वसुली स्थगित करावी, असे निर्देश संबंधित अस्थापनांना दिल्याचे मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

Related posts

पिंपरी: महात्मा जोतीराव फुले यांच्या स्मृतीदिनानिमित्त महापालिकेच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन.

pcnews24

शहरातील उद्याने होणार सिनेमा, वर्ल्ड पार्क थीम्सवर विकसित… नागरिकांकडून मागितले अभिप्राय.

pcnews24

महानगरपालिका:नागरिकांना पिण्याचे पाणी उकळून,गाळून पिण्याचे आवाहन

pcnews24

वाढत्या तापमानात घ्या आरोग्याची काळजी.

pcnews24

घरकुलच्या माध्यमातून नागरिकांचे घराचे स्वप्न साकार होत आहे .

pcnews24

महापालिका शिक्षण विभागाच्या कोअर टीमचा दिल्ली अभ्यास दौरा..काय आहे शिक्षकांनची या दौऱ्या संदर्भातील ध्येय उद्दीष्टे?

pcnews24

Leave a Comment