February 24, 2024
PC News24
कला

‘बाईपण भारी देवा’! कोटींची कमाई ,’ मराठी ‘ चित्रपटाने कमावला तीन आठवड्यात 58 कोटींचा गल्ला.

‘बाईपण भारी देवा’! कोटींची कमाई ,’ मराठी ‘ चित्रपटाने कमावला तीन आठवड्यात 58 कोटींचा गल्ला

केदार शिंदे यांनी दिग्दर्शन केलेल्या ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाने 3 आठवड्यात कोटींचे उड्डाणे घेत 58 कोटींचा गल्ला कमावला आहे. मराठी चित्रपटासाठी तिसऱ्या आठवड्यात ही कमाई अत्यंत चांगली असून,मराठी प्रेक्षकां कडून या चित्रपटाला भरघोस प्रतिसाद मिळत आहे व त्यात महिलांची संख्या लक्षणीय आहे. पहिल्या आठवड्यात चित्रपटाने 12 कोटी कमावले होते व दुसऱ्या आठवड्यात साधारण 24 कोटी कमावले होते. तिसऱ्या आठवड्यात 21 कोटींची कमाई करून चित्रपटाने मराठी सिनेसृष्टीवर सध्या स्वतःचे वर्चस्व गाजवले आहे.

पहिल्या आठवड्यात ‘आदिपुरुष’ ची स्पर्धा होती पण तो पडल्यावर चित्रपटाला बाकी वयोगटाचे सुद्धा प्रेक्षक मिळाले आणि हा चित्रपट आता जोरात चालू आहे.

निर्मात्यांनी मध्यम वर्गीय व सर्व वयातील गृहिणींना केंद्रस्थानी ठेवून चित्रपट बनवला आहे. त्यामुळेच चित्रपटाला सुरुवाती पासून महिलांकडून चांगला प्रतिसाद मिळाला.केदार शिंदे दिग्दर्शित या चित्रपटामध्ये रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या कुलकर्णी मोने, सुचित्रा बांदेकर, शिल्पा नवलकर, दीपा परब, शरद पोंक्षे यांच्यासारखे कर्तृत्ववान व ज्येष्ठ कलाकारांची स्टार कास्ट होती, चित्रपटाबद्दल मराठी सिनेमा रसिकांच्यात आधीपासूनच उत्सुकता होती.

Related posts

मावळ:मराठी चित्रपट अभिनेता रवींद्र महाजनी आढळले मृतावस्थेत.

pcnews24

महाराष्ट्र:मानवी मनोरे रचताना दुर्घटनाग्रस्त झालेल्या गोविंदांना मिळणार इतके विमा संरक्षण.

pcnews24

देवाची आळंदी पुणे येथील शाळांमध्ये डोळे येण्याची साथ, १६०० विद्यार्थ्यांना डोळ्यांचा संसर्ग.

pcnews24

संघ परिचय वर्ग व साहित्यिक मिलन कार्यक्रमास पिंपरी चिंचवडचे मान्यवर ४० साहित्यिक उपस्थित.

pcnews24

वाचकमैफल’ नवोदित लेखक,कवींच्या सदैव पाठीशी”- गझलकार अनिल आठलेकर संस्कार भारती पिंपरी चिंचवड समिती वाचक मैफल उत्साहात.

pcnews24

आंतरराष्ट्रीय: वीर दासने जिंकला आंतरराष्ट्रीय एमी अवॉर्ड

pcnews24

Leave a Comment