February 24, 2024
PC News24
कला

देवाची आळंदी पुणे येथील शाळांमध्ये डोळे येण्याची साथ, १६०० विद्यार्थ्यांना डोळ्यांचा संसर्ग.

देवाची आळंदी पुणे येथील शाळांमध्ये डोळे येण्याची साथ, १६०० विद्यार्थ्यांना डोळ्यांचा संसर्ग

पुण्यातील देवाच्या आळंदीमध्ये शालेय विद्यार्थ्यांमध्ये डोळे येण्याची साथ पसरली आहे. वातावरणातील बदलामुळे साथ आल्याचा अंदाज आहे. आळंदीत तीन दिवसांमध्ये १६०० मुलांना डोळ्याच्या साथीची लागण झाली. ज्या शाळेत लागण होण्याचं प्रमाण आहे, तिथं शाळा बंद ठेवण्याच आवाहन वैद्यकीय विभागाने केले आहे.

वातावरणात झालेल्या बदलामुळे ६ ते १६ वयोगटातील मुलांमध्ये डोळे येण्याची साथ पसरली आहे. ग्रामीण रुग्णालयात या साठीसाठी स्वतंत्र ओपीडी सुरू करण्यात आला आहे. आळंदीत वारकरी शिक्षण घेण्यासाठी आलेल्या आणि शाळेतील पहिली ते दहावीच्या मुलांमध्ये डोळे येण्याचं प्रमाण जास्त आहे. डोळ्यांची साथ अधिक पसरू नये म्हणून आळंदीत घरा- घरात जाऊन मुलांची तपासणी करण्यात येणार आहे. त्याचबरोबर शेजारील गावात ही आरोग्य पथक दाखल होणार आहे. ज्या शाळांमध्ये डोळ्यांची साथ अधिक आहे त्या शाळांना सुट्टी देण्याचं आवाहन करण्यात आल्याची माहिती वैद्यकीय तालुका अधिकारी इंदिरा पारखे यांनी दिली.

डोळे येण्याची लक्षणे

* डोळ्यांची जळजळ होणे

* डोळ्यातील सतत घाण येणे

* डोळ्यातून पाणी येणे

* डोळ्याच्या पापण्या चिकटणे

 

खबरदारी व उपाय

* डोळ्यांना हाथ लावल्यानंतर हाथ स्वच्छ धुवावेत.

* डोळे आलेल्या व्यतीने चष्मा घालूनच घराबाहेर पडावं.

* डॉक्टरांच्या सल्ल्याने वेळीच उपचार घ्यावेत.

Related posts

‘थिएटर वर्कशॉप कंपनी’संस्थेत रंगणार प्रायोगिक नाट्यकलांचा महोत्सव’

pcnews24

सिनेट निवडणुकीचे संभाव्य वेळापत्रक जाहीर!!

pcnews24

लेखणी सावरकरांची मधून उलगडले स्वा. सावरकरांचे प्रेरणादायी सहित्य

pcnews24

पिंपरी चिंचवड:प्राधिकरणात रंगणार रौप्य महोत्सवी स्वरसागर सांस्कृतिक महोत्सव.

pcnews24

सात्विक,सोज्वळ सौंदर्य काळाच्या पडद्याआड,ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदी यांनी ९४व्या घेतला अखेरचा श्वास

pcnews24

आपला इतिहास बदलण्याचे षडयंत्र करणाऱ्या ‘आदिपुरुष’ वर बंदी घालण्याची मागणी,खासदार श्रीरंग बारणे यांचे निवेदन

pcnews24

Leave a Comment