February 24, 2024
PC News24
गुन्हा

पुणे कॅम्प परिसरातील कपड्याच्या दुकानात तरुणीचा विनयभंग

पुणे कॅम्प परिसरातील कपड्याच्या दुकानात तरुणीचा विनयभंग

पुण्यातील कॅम्प परिसरातील एमजी रस्त्यावर एक २० वर्षीय तरुणी एका कपड्याच्या दुकानात टी-शर्ट खरेदी करण्यासाठी गेली असता तेथील कामगाराने तिच्यासोबत लगट करण्याचा प्रयत्न करून तिचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

या तरुणाने टी-शर्ट घेण्यास आलेल्या तरुणीला “आपण तुला टी-शर्ट घालण्यास मदत करतो”, असा बहाणा करत तिच्याशी अश्लील चाळे केले. या प्रकरणी २० वर्षीय पीडित तरुणीने लष्कर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरून कैफ करीममुल्ला शेख याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित तरुणी ही २० जुलै रोजी दुपारी सव्वा एकच्या सुमारास त्या दुकानात टी-शर्ट खरेदी करण्यासाठी गेली होती. अनेक टी-शर्ट पाहिल्यानंतर तिला एक टी-शर्ट आवडला. तिने तो घेत अंगावरील पहिल्या टी-शर्ट वरच नवीन टी-शर्ट ट्राय केला. यावेळेस नराधम कैफने तिला टी-शर्ट घालण्याचा बहाणा करून पीडित तरुणीशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. तसेच, तिच्याशी अश्लील चाळे केले. यानंतर घाबरलेल्या तरुणीने लष्कर पोलीस ठाणे गाठत कैफ करीममुल्ला शेख याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. पुढील तपास उपनिरीक्षक एस मोकाटे हे करत आहेत.

पुण्याच्या मुख्य भागात आणि भरदिवसा अशा प्रकारच्या घटना घडत असतील तर पुण्यात महिला खरंच सुरक्षित आहेत का? असा प्रश्न विचारण्यात येत आहे.

Related posts

कामगाराच्या सतर्कतेने बँकेतील चोरीचा प्रयत्न फसला

pcnews24

जितेंद्र आव्हाडांवर अदखलपात्र गुन्हा दाखल.

pcnews24

संपत्तीच्या वादावरुन जादूटोणा,अघोरी कृत्य केल्याचा प्रकार उघडकीस,सहा जणांवर गुन्हा दाखल.

pcnews24

पिंपरी चिंचवड:तरुणींच्या छेडछाडीबाबत पोलिस तात्काळ कारवाई करणार”- विनयकुमार चौबे- पोलिस आयुक्त.

pcnews24

बेकायदेशीर गॅस cylinder रिफिलिंग करणाऱ्यावर पोलिसांची धडक कारवाई.

pcnews24

फेक इंस्टाग्राम अकाउंटवरून महिलेस ब्लॅकमेल

pcnews24

Leave a Comment