February 24, 2024
PC News24
पिंपरी चिंचवडसामाजिक

पिंपरी चिंचवड: पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी आयोजित केला पोलीस पाटील यांचा मार्गदर्शन मेळावा.

पिंपरी चिंचवड: पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी आयोजित केला पोलीस पाटील यांचा मार्गदर्शन मेळावा

गुन्हेगारांना वचक बसविण्यासाठी विविध योजना राबविणारे विनयकुमार चौबे यांनी अजून एक चांगला उपक्रम आयोजीत केला आहे.पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीतील, पोलीस पाटील यांचा मार्गदर्शन मेळावा व कार्यशाळा पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी शुक्रवारी (दि.22) आयोजित केला होता त्यावेळी त्यांना मार्गदर्शन केले आहे.

हा कार्यक्रम देहूरोड पोलीस स्टेशन अंतर्गत देहुगाव येथील संत तुकाराम मंगल कार्यालय येथे संपन्न झाला. याप्रसंगी पिंपरी चिंचवड अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी यांनी पोलीस पाटलांना येणाऱ्या अडीअडचणी संदर्भात अतिशय मोलाचे मार्गदर्शन केले. यावेळी आयुक्तालय हद्दीतील 80 पोलीस पाटील उपस्थित होते. यावेळी पिंपरी चिंचवड सहाय्यक पोलीस आयुक्त पद्माकर घनवट, महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघाचे राज्याध्यक्ष बाळासाहेब बाजीराव शिंदे पाटील, पुणे जिल्हा पोलीस पाटील संघाचे जिल्हाध्यक्ष साहेबराव राळे पाटील, पश्चिम महाराष्ट्र महिला आघाडी पोलीस पाटील संघाच्या अध्यक्ष तृप्ती मांडेकर पाटील, खेड तालुका पोलीस पाटील संघाचे अध्यक्ष अमोल पाचपुते पाटील, मावळ तालुका पोलीस पाटील संघाचे अध्यक्ष लक्ष्मण शितोळे पाटील उपस्थित होते.

प्रमुख वक्ते व मार्गदर्शक डॉ राम पठारे सेवानिवृत्त पोलीस उपाधीक्षक व राज्य अध्यक्ष बाळासाहेब शिंदे पाटील यांनी पोलीस पाटलांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक.निशांत करंडे पाटील यांनी केले तर सूत्रसंचालन अमोल पाचपुते पाटील यांनी तर सर्व उपस्थित यांचे आभार देहूरोड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी यांनी केले.

Related posts

चिंचवड देवस्थान ट्रस्टतर्फे निर्माल्यापासून उदबत्तीची निर्मिती

pcnews24

अरे बापरे,पिंपरी-चिंचवडमध्ये 401 अपघात !!! 

pcnews24

‘द केरळ स्टोरी’

pcnews24

मद्यप्राशन केलेल्या तरुणाची धावत्या बसवर दगडफेक.

pcnews24

अभ्यासक्रमात सावरकरांची जीवनगाथा

pcnews24

चिखलीत गोळी घालून मित्राची हत्या

pcnews24

Leave a Comment