February 24, 2024
PC News24
राजकारण

महाराष्ट्र:आज मुख्यमंत्रिपदाचा प्रश्नच उद्भवत नाही…काय म्हणाले तटकरे?

महाराष्ट्र:आज मुख्यमंत्रिपदाचा प्रश्नच उद्भवत नाही…काय म्हणाले तटकरे?

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि आमदार अमोल मिटकरी यांनी अजित पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने केलेले ट्विट, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी वाढदिवसा निमित्त लावलेले बॅनर आणि शिवसेना उबाठाच्या नेत्यांची रोज उठून शिंदेचं मुख्यमंत्रीपद जाणार अशी होत असलेली टीका, त्यामूळे,अजित पवार लवकरच मुख्यमंत्री होणार या चर्चांना अधिकच हवा मिळाली. परंतु या संदर्भात आज राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (अजित पवार गट)यांनी केलेल्या स्पष्टीकरणामुळे अजित पवार मुख्यमंत्री होणार का? या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.

या चर्चांवर आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (अजित पवार गट)यांनी स्पष्टीकरण दिले आहे.’राज्याच्या सत्तेत आम्ही ज्यावेळेला सहभागी झालो त्याच वेळी या गोष्टीची स्पष्टता आली आहे. आता आम्ही महायुतीत एनडीएचे घटक आहोत. दादा मुख्यमंत्री व्हावेत, अशी राज्याच्या जनतेची आणि कार्यकर्त्यांची इच्छा-अपेक्षा जरूर आहे पण आघाडीच्या राजकारणातील अपरिहार्यता लक्षात घेता भविष्यात आम्ही एनडीएच्या माध्यमातून काम करण्याचं निश्चित केलं आहे. त्यामुळे आज मुख्यमंत्रिपदाचा प्रश्नच उद्भवत नाही, असं सांगताना सुनील तटकरे यांनी दादांच्या मुख्यमंत्रिपदाचा विषय क्लिअर केला आहे.

Related posts

कोण होणार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुढचे सुत्रधार?

pcnews24

बारामती लोकसभा मतदार संघातील कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे.- राहुल कुल

pcnews24

अजित पवार यांचा काल पुण्यामध्ये रोड शो;पार्थ पवार पुन्हा सक्रिय

pcnews24

4 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा उद्या निकाल.

pcnews24

राज्य:’मी कोर्टाला शिव्या घातल्या म्हणून भुजबळ बाहेर’.

pcnews24

विधानसभेत केलेल्या मागणीला यश;महावितरणच्या आकुर्डी व भोसरी विभागाचे विभाजन : आ महेश लांडगे

pcnews24

Leave a Comment