February 24, 2024
PC News24
गुन्हा

भोसरीमध्ये टोळक्याचा हैदोस ; वाहने अडवून पैशाची मागणी.

भोसरीमध्ये टोळक्याचा हैदोस ; वाहने अडवून पैशाची मागणी

शनिवारी (दि. 22) पहाटे तीन वाजताच्या सुमारास शास्त्री चौक, भोसरी येथे टोळक्याने भर रस्त्यात वाहने अडवून वाहन चालकांकडून पैशाची मागणी करत वाहनाची तोडफोड केली. यासंबंधी नितीन चंद्रकांत कांबळे (वय 30, रा. चक्रपाणी वसाहत भोसरी) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या कारमधून शास्त्री चौक भोसरी येथून जात असताना दुचाकीवरून आलेल्या गुंडांनी त्यांना अडवले. दगड हातात घेऊन त्यांनी रस्त्यावर दहशत पसरवली. रस्त्याने जाणाऱ्या इतर गाड्या देखील अडवून त्यांच्याकडे पैशांची मागणी केली.तसेच शिवीगाळ करत फिर्यादी यांच्या खिशातून 200 रुपये जबरदस्तीने काढून घेतले व त्यांच्या गाडीवर दगड मारून गाडीचे नुकसान केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

पोलिसांनी या प्रकरणी अविनाश नरेश गायकवाड (वय 18, रा. आळंदी), दिनेश मधुकर वाघमारे (रा. चक्रपाणी वसाहत भोसरी), पियुष कांबळे (रा. विश्रांतवाडी, पुणे), अजय (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोसरी पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Related posts

मावळचे राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांच्यासह सात जणांच्या विरोधात गुन्हा दाखल किशोर आवारे हत्याप्रकरण

pcnews24

मी आत्महत्या करतोय, माझा शोध घेऊ नका’ नक्की काय प्रकार आहे ?

pcnews24

गुंडा विरोधी पथकातील पोलिसांना टोळक्याकडून मारहाण

pcnews24

संभाजीनगर,चिंचवड:बालविवाह प्रकरणी मुलीच्या पालकांवर गुन्हा

pcnews24

ठाणे, मुंबई परिसरात वाढत्या मोटार सायकल चोरी प्रकरण उघड,त्रिकुटास मुंब्रा पोलीसांकडून अटक.

pcnews24

निगडी:केवळ चप्पल दुकानाबाहेर काढण्यास सांगितले आणि…?? व्यापाऱ्यांकडून बंदची हाक

pcnews24

Leave a Comment