February 24, 2024
PC News24
गुन्हा

वाघोली, पुणे:७० वर्षीय निवृत्त बँक मॅनेजर खूनाची धक्कादायक घटना.. ताम्हीणी घाटात सापडला मृतदेह

वाघोली, पुणे:७० वर्षीय निवृत्त बँक मॅनेजर खूनाची धक्कादायक घटना.. ताम्हीणी घाटात सापडला मृतदेह

70 वर्षीय निवृत्त बँक मॅनेजरचे अपहरण करुन खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पैशाचा तगादा लावला म्हणून खून करून आरोपींनी ताम्हीणी घाटात त्य़ा मृतदेहाची विल्हेवाट लावली होती. याप्रकरणी गुन्हे शाखा युनिट 2 व चिंचवड पोलीसांनी आरोपींना बेड्य़ा ठोकल्या आहेत.

रणजित मेला सिंग (वय 70 रा. वाघोली, पुणे) असे मयत नागरिकाचे नाव असून ते पंजाब सिंध बँकेत मॅनेजर या पदावरून सेवानिवृत्त झाले होते. आत्तापर्यंत पोलिसांनी या प्रकरणात तीन आरोपींना अटक केली आहे. यातील मुख्य आरोपी नारायण बाबुराव इंगळे (वय 46 रा.चिंचवडगाव) याला पोलिसांनी आधीच अटक केले होते.

तर, घरकूल परिसरातून सुपारी घेऊन खून करणारे आरोपी राजेश नारायण पवार, समाधान ज्ञानोबा म्हस्के (दोघे रा. चिखली) यांना सापळा रचून चिखली गुन्हे युनीट शाखा दोनच्या पथकाने अटक केली.चिंचवड पोलीस ठाण्यात सिंग यांचे जावई आदित्य पाकलपाटी (वय 39, रा.हैद्राबाद) यांनी याप्रकऱणी फिर्याद दिली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, नारायण इंगळे याने रणजीत सिंग यांच्याकडून 30 लाख रुपये उसने घेतले होते. ते पैसे परत दे म्हणून सिंग यांनी नारायण इंगळे याच्याकडे सतत तगादा लावला. नारायण इंगळे याला हे पैसे परत द्यायचे नव्हते.यासाठी त्याने सिंग यांना संपवण्याचाच कट आखला. यासाठी त्याने त्याचे मित्र राजेश व समाधान यांना हाताशी घेतले व त्यांना सिंग यांच्या खूनासाठी 4 लाख रुपयांची सुपारी दिली.

कटानुसार सिंग यांना 19 जुलै रोजी इंगळे याने चिंचवड येथील त्याच्या राहत्या घरी पैसे देतो म्हणून बोलावून घेतले. ते घरी आल्यानंतर त्यांच्या सोबत बोलत असताना इंगळे व राजेश यांनी मागून येऊन सिंग यांचा दोरीने गळा आवळून व समाधान म्हस्के याने चाकूने चार ते पाच वेळा भोकसून ठार मारले.सुरुवातीला आरोपींनी एकमेकांना ओळखत नसल्याचे खोटे सांगितले पण पोलीसी वर्दीचा खाक्या दाखवताच आरोपींनी गुन्हा केल्याचे कबुल केले.

सिंग यांचा मृतदेह खून केल्यानंतर प्लास्टिकमध्ये गुंडाळुन बेडशीटमध्ये बांधून त्यांच्याच ब्रेझा गाडीत टाकला. पुढे राजेश पवार व समाधान म्हस्के यांनी त्यांच्या मृतदेहाची विल्हेवाट ताम्हीणी घाटात धबधब्या जवळच्या नाल्यात टाकून व गाडी माणगाव एम.आय.डी.सी. परिसरात सोडली असल्याचे सांगितले.आरोपींनी मृतदेहाची विल्हेवाट लावलेले ठिकाण व गाडी सोडल्याचे ठिकाण दाखवून दिले. त्याप्रमाणे पोलीसांनी मयत इसमाचा मृतदेह व गाडी ताब्यात घेतली आहे.ही कारवाई गुन्हे शाखा युनिट 2 चे पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम, कृष्णदेव खराडे व पोलीस निरिक्षक गुन्हे प्रकाश जाधव, पोलिस उप निरीक्षक गणेश माने, पोलीस उप-निरीक्षक शंभु रणवरे, गुन्हे शाखा युनिट 2 कडील पोलीस अंमलदार जयवंत राऊत, प्रमोद वेताळ, देवा राऊत जमिर तांबोळी, संतोष इंगळे, सागर अवसरे, विपुल जाधव, आतिष कुडके चिंचवड पोलीस स्टेशन कडील पोलीस अंमलदार पांडुरंग जगताप, धर्मनाथ तोडकर, पंकज बदाणे, उमेश वानखेडे यांच्या पथकाने कारवाई केली.

Related posts

संगनमत करून अल्पवयीन मुलीचे लग्न लावून दिले.. ‘बालविवाह प्रतिबंधक’ कायद्या अंतर्गत 15 ते 16 जणांविरोधात गुन्हा दाखल

pcnews24

महिलेशी मोबाईलवर अश्लील वर्तन, पोलिस अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल,आयपीएस अधिकारी…

pcnews24

पराग देसाईंचा कुत्र्यांच्या हल्ल्यात मृत्यू ?

pcnews24

‘ त्या सराईत गुन्हेगारांना’ पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने केले अटक…

pcnews24

खेड:टँकर चालकाने केली तेलाची परस्पर विक्री-चालकासह तिघांना अटक.

pcnews24

खंडणीची धमकी देणाऱ्यास पोलिसांकडून अटक, आमदार महेश लांडगे, काँग्रेसचे माजी नगरसेवक अविनाश बागवे, मनसेचे नेते वसंत मोरे अशा राजकीय नेत्यांना केले होते टार्गेट.

pcnews24

Leave a Comment