February 24, 2024
PC News24
गुन्हा

गातेगाव:चारित्र्यावर संशय घेणाऱ्या पतीला पत्नीनेच संपवले.

गातेगाव:चारित्र्यावर संशय घेणाऱ्या पतीला पत्नीनेच संपवले.

 

फिर्याद देणारी पत्नीच निघाली आरोपी”..पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या मार्गदर्शनात पोलिसांनी केलेल्या तपासात सत्य घटना उलगडली.

याबाबत पोलिसांच्या माहितीनुसार, पोलीस ठाणे गातेगाव हद्दीमधील जोडजवळा येथे राहणारी एका महिलेने “शेताच्या वादातून त्याच्या पतीचा नात्यातील इसमाने डोक्यावर कोयत्याने मारून खून केला.” अशी तक्रार खुन करणाऱ्या इसमाच्या नावासह मयत इसमाच्या पत्नीने दिली होती‌. त्यावरून पोलीस ठाणे गातेगाव येथे गुन्हा नोंद करण्यात आला होता पोलिसांनी आरोपीस तात्काळ अटकही केली होती.

खुनाच्या गुन्ह्यातील कारणाचा तपास करताना मोठ्या प्रमाणात विसंगती आढळून आली.यामुळे पोलीस अधीक्षक श्री.सोमय मुंडे यांनी खुनाच्या गुन्ह्याचा बारकाईने तपास करण्यासंदर्भात पोलीस ठाणे गातेगाव व स्थानिक गुन्हे शाखेला आदेश दिले. त्याअनुषंगाने खुनाच्या गुन्ह्याचा तपास करण्याकरिता पोलीस ठाणे गातेगाव व स्थानिक गुन्हे शाखेचे संयुक्त पथक तयार करण्यात आले होते. सदर पथकास पोलीस अधीक्षक श्री सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे, उपविभागीय पोलिस अधिकारी, लातूर ग्रामीण श्री. सुनील गोसावी हे वेळोवेळी सूचना व मार्गदर्शन करत होते. संयुक्त पथकाने सदर गुन्ह्यातील अटक आरोपी, फिर्यादी, साक्षीदार,यांच्याकडे अतिशय बारकाईने, विविध मुद्द्यावर सखोल विचारपूस केली. तेव्हा फिर्यादी,अटक आरोपी, साक्षीदार यांच्या सांगण्यामध्ये मोठ्या प्रमाणात विसंगती असल्याचे समोर आले.

त्यावरून फिर्यादीला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता खुनाच्या गुन्ह्यातील फिर्यादीनेच तिची आई व आणखीन दोन पुरुषाच्या मदतीने पतीचा खून केल्याचे सांगून करून मयत नामे हनमंत कटारे हा त्याची पत्नी पूजाच्या चारित्र्यावर संशय घेऊन सतत मारहाण करीत होता. या सततच्या त्रासाला कंटाळून आई व इतर दोन पुरुषाच्या सहाय्याने पतीचा खून करून तो खून दुसऱ्या एका इसमानेच केल्याचा बनाव रचल्याचे कबूल केले.यावरून पोलीस पथकाने गुन्ह्यातील खरे आरोपी नामे

1) राजेंद्र विद्याधर नितळे, वय 54 वर्ष, राहणार बोरगाव, लातूर

2) दत्तात्रय नागनाथ लोंढे, वय 55 वर्ष, रा.जागजी तालुका जि.उस्मानाबाद.

निर्मला पांडुरंग दयाळ, वय 50 वर्ष, रा. ठोंबरे नगर,मुरुड तालुका लातूर.

पूजा हनमंत कटारे, वय 30 वर्ष, रा. जोडजवळा, लातूर. (यातील फिर्यादी व मयताची पत्नी)यांना सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास गातेगाव पोलीस करीत आहेत.

पोलीस ठाणे गातेगाव व स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे यांचे मार्गदर्शनात गुन्ह्याचा बारकाईने तपास करून गुन्ह्यातील खऱ्या आरोपींना गजाआड केले.

ही कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनात लातूर ग्रामीणचे उपविभागीय पोलिस अधिकारी श्री.सुनील गोसावी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री‌.गजानन भातलवंडे यांच्या नेतृत्वात गातेगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सपोनी ज्ञानदेव सानप , स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनी श्री. प्रवीण राठोड ,पोलीस अमलदार संजय भोसले, सुधीर कोळसुरे, सिद्धेश्वर जाधव, प्रकाश भोसले, राजेश कंचे, बंटी गायकवाड, प्रदीप चोपणे, शिरीष पाटील ,वाल्मीक केंद्रे, दशरथ गिरी, रामदास नाळे, जीवन राजगीरवाड, अतुल पतंगे, संजय मोरे यांनी केली आहे.

Related posts

पुण्यात ३० वर्षीय महिला कंडक्टरचा विनयभंग, सहकाऱ्याला अटक

pcnews24

जुनी भांडणे सोडवल्याच्या रागातून तरुणाला मारहाण; तिघांना अटक

pcnews24

चिंचवड:पत्नी व तिच्या घरच्यांकडून पतीचा घटस्फोटासाठी छळ, पतीची आत्महत्या

pcnews24

पुणे: पोलीस अकादमीमध्ये एकत्र शिकत असलेल्या अल्पवयीन मुलीवर सहकाऱ्या कडूनच अत्याचार

pcnews24

पुण्यातील कोरेगाव पार्कमधील हॉटेल मध्ये तिरंग्याचा अपमान

pcnews24

समुपदेशन कार्यक्रमातून चार वर्षापूर्वी अल्पवयीन मुलीसोबत घडलेली बलात्काराची घटना उघड

pcnews24

Leave a Comment