February 24, 2024
PC News24
तंत्रज्ञान

महाराष्ट्र:सोशल मीडियावर महापुरूषांची बदनामी करणाऱ्याना बसणार दणका.. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस.

महाराष्ट्र:सोशल मीडियावर महापुरूषांची बदनामी करणाऱ्याना बसणार दणका.. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस

आद्यसमाजसुधारक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयी खोट्या माहितीच्या आधारे चुकीची मांडणी करणारे लेख ‘इंडिक टेल्स’ आणि ‘हिंदू पोस्ट’ या वेबसाइटवर आणि ‘भारद्वाज स्पीक’ या ट्विटर अकाऊंटवर करण्यात आले. ‘स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्यावर इतिहासाची पुनर्मांडणी करण्याच्या नावाखाली काही जातीयवादी शक्ती पुन्हा चिखलफेक करीत आहे.

सोशल मीडियावर अशा प्रकारे महापुरुष आणि महान व्यक्तींच्या विरोधात बदनामीकारक मजकूर प्रसिद्ध करून लोकभावना दुखावणे आणि समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी राज्य सरकारने धोरण ठरविण्याचे निश्चित केले आहे.त्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात येणार आहे. समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर सोशल मीडियावरील त्या प्रवृतींवर कठोर कारवाई करण्याचा मानस आहे’, असे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी विधान परिषदेत स्पष्ट केले.

बदनामीकारक मजकूर प्रसिद्ध करून दिशाभूल करणाऱ्या संबंधितांवर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी’, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी मुंबई पोलिस आयुक्तांकडे केली होती. मात्र वादग्रस्त वेबसाइटवरून तो बदनामीकारक मजकूर वगळला असे म्हणत सरकार आपली जबाबदारी झटकणार काय, असा प्रश्न राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे अमोल मिटकरी यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे सभागृहात मांडला होता.
‘सभागृहात अमोल मिटकरी यांनी मांडलेल्या भावनेशी सरकार सहमत आहे. सावित्रीबाई फुले यांच्या अपमानाचा शासनाने निषेध केला आहे. मुंबई पोलिस आयुक्तांना संबंधितांवर कडक कारवाईचे निर्देश दिले होते. याबाबत ट्विटरला तीनदा पोलिसांनी पत्र पाठवूनही त्याचे उत्तर आलेले नाही.
सोशल मीडियावर वादग्रस्त मजकुराच्या विरोधात कारवाई करण्यास सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने काही पळवाटा तयार झाल्या आहेत. केंद्राचा आयटी कायदा लागू तर अशा प्रकरणात भारतीय दंड संहितेनुसार कारवाई करता येत नाही’असे गृहमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.

Related posts

देश:चांद्रयान-३ मोहिमेत महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यातील दोघांचा समावेश.

pcnews24

NVS-1 उपग्रह लाँच,काय महत्व आणि फायदे, नक्की वाचा.

pcnews24

देश:चांद्रयान-३चा चंद्राच्या कक्षेत प्रवेश;महत्त्वाचा टप्पा यशस्वीपणे पार पडला.

pcnews24

अभिनंदनीय!!! चांद्रयान-3 असे उतरले चंद्रावर… पाहा व्हिडिओ सह!!

pcnews24

G-20 परिषदेच्या थेट प्रक्षेपणाची जबाबदारी प्रमोद दाभोळे या मराठमोळ्या युवकावर; भारतानं टाकला विश्वास! मीडिया कोऑर्डिनेटर म्हणून निवड

pcnews24

पिंपरी चिंचवड:औद्योगिक क्षेत्रात सामुदायिक ‘सोलर एजर्नी प्रकल्प प्रस्ताव-आमदार महेश लांडगे.

pcnews24

Leave a Comment