February 24, 2024
PC News24
कला

चिंचवड: संस्कार भारती तर्फे पिंपरी चिंचवडमधे ‘वाचक मैफलीचा’ उत्साहात शुभारंभ!

चिंचवड: संस्कार भारती तर्फे पिंपरी चिंचवडमधे ‘वाचक मैफलीचा’ उत्साहात शुभारंभ!

संस्कार भारती पिंपरी चिंचवड समिती साहित्य विधेच्या वतीने २४ जुलैला भारतमाता भवन चिंचवड येथे वाचक मैफल आयोजित करण्यात आली.पुण्यामध्ये गेली ५ वर्ष यशस्वीपणे सुरू असलेल्या या ‘वाचक मैफल’ उपक्रमाची सुरुवात आज पिंपरी चिंचवड मधे प्रसिद्ध लेखक कवी,

गझलकार श्री अनिल आठलेकर यांच्या उपस्थितीत झाली.वाचक मैफलीच्या स्वरूपाबद्दल सांगताना श्री.आठलेकर म्हणाले की “वाचनाची आवड जोपासताना आपण काय वाचले याविषयी इतर रसिक वाचकांशी देवाणघेवाण व्हावी व आपल्या वाचनाच्या कक्षा रूंद व्हाव्यात या हेतूने हा उपक्रम सुरू करण्यात आला.दर महिन्याच्या ठराविक दिवशी घेण्यात आलेल्या या उपक्रमाला सर्व वयोगटातल्या वाचकांनी उत्तम प्रतिसाद दिला.आता याच प्रेरणेतून आज पिंपरी चिंचवडमधे या वाचक मैफल उपक्रमाचा आज शुभारंभ होतो आहे.”

त्यानंतर उपस्थित वाचकांनी आपला परिचय देत वाचनाच्या आवडी विषयी व आवडत्या पुस्तकांविषयी स्वतःचे मनोगत व्यक्त केले.संस्कारभारतीच्या ध्येयगीताने कार्यक्रमाची सुरवात झाली. साहित्यविधा प्रमुख सौ.प्रणिता बोबडे यांनी संस्कार भारतीविषयी व पिंपरी चिंचवड समितीच्या उपक्रमां विषयी उपस्थितांना माहिती सांगितली व सहविधासंयोजक सौ.शुभदा दामले यांनी वाचक मैफलच्या श्री.अनिल आठलेकर यांचा थोडक्यात परिचय करून दिला.

पहिल्या वाचक मैफलीसाठी श्री.धनंजय तडवळकर,सौ.अन्वी आठलेकर यांच्यासह पुण्यातील वाचक मैफिलीशी जोडले गेलेले अनेक वाचक आवर्जून उपस्थित होते.

पिंपरी चिंचवड साहित्यविधेतील लेखक पत्रकार श्री.प्रदीप गांधलीकर यांच्यासह अनेक सदस्य,प्रकाशक श्री नितीन हिरवे व परिसरातील रसिक वाचकांची कार्यक्रमाला उपस्थिती होती.

वाचक मैफलीचे पहिले पुष्प लेखक सतीश काळसेकर यांना समर्पित केले होते. अन्वी आठलेकर यांनी त्यांच्या ‘वाचणाऱ्याची रोजनिशी’ या पुस्तकातील काही भागाचे वाचन केले.

पिंपरी चिंचवड शहरामध्ये संस्कार भारतीच्या वतीने होणाऱ्या या वाचक मैफिल साठी स्व.तात्या बापट स्मृती समितीने विनामूल्य हॉल उपलब्ध करून दिला त्याबद्दल तात्या बापट स्मृती समिती आणि भारतमाता भवन व्यवस्थापनाचे मनपूर्वक आभार!!या वाचक मैफिलीसाठी संस्कार भारती पश्चिम प्रांत संयोजिका सौ.विशाखा कुलकर्णी,पिं.चिं.समिती संपर्क मंत्री सौ.सायली काणे,बालविभाग सह संयोजक प्रमुख सौ.स्मिता देशपांडे,रांगोळीविधा सहसंयोजक सुनीता कुलकर्णी यांची कार्यक्रमाला विशेष उपस्थिती होती.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.शुभदा दामले यांनी केले.

Related posts

भरत जाधव हसवणार नाही तर रडवणार.

pcnews24

महानगरपालिकेच्या वतीने शहरवासीयांसाठी दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी दिवाळी पहाटचे आयोजन…

pcnews24

शास्त्रीय कला केवळ मनोरंजन करण्यापुरत्या मर्यादित नसतात- ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे -संस्कार भारती‌ची अखिल भारतीय कार्यकारिणी बैठक पुण्यात संपन्न.

pcnews24

चित्रपटनगरी :’शुटींग आधी मासिक पाळीच्या डेटबाबत विचारले’

pcnews24

सात्विक,सोज्वळ सौंदर्य काळाच्या पडद्याआड,ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदी यांनी ९४व्या घेतला अखेरचा श्वास

pcnews24

‘लढा मराठवाडा मुक्तिसंग्रामाचा’ विशेषांक प्रकाशन सोहळा, राहुल सोलापूरकर प्रमुख वक्ते.

pcnews24

Leave a Comment